ETV Bharat / state

Nilesh Rane Vs Deepak Kesarkar: दीपक केसरकर लायकी पेक्षा जास्त बोलू नका; निलेश राणे यांची टीका - निलेश राणे यांची टीका

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जेव्हापासून गेली तेव्हापासून राणे पिता-पुत्रांचा टीका करण्याचा सपाटा जास्तच वाढला. मात्र, आता शिवसेना फुटली असून शिंदे गट आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि हे युतीचे सरकार आहे असे सांगत आहे. ( Nilesh Rane Vs Deepak Kesarkar ) परंतु, राणे यांचा ठाकरे कुटुंबावरील रोष काही कमी झालेला नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी जहरी भाषेत टीका केली आहे.

निलेश राणे आणि दिपक केसरकर
निलेश राणे आणि दिपक केसरकर
author img

By

Published : Jul 13, 2022, 8:45 PM IST

Updated : Jul 13, 2022, 11:10 PM IST

सिंधुदुर्ग - उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांची वारंवार ट्विटरवरून किंवा जाहीर प्रतिक्रियांमधून खिल्ली उडवणाऱ्या राणे सुपुत्रांमुळे भाजप आणि शिंदे गटात खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Deepak Kesarkar ) आता दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावरून माजी खासदार निलेश राणे भडकले आहेत. त्यांनी थेट केसरकर यांची लायकी काढली आहे.

माजी खासदार निलेश राणे

दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी सुनावले - एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला तरीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंप्रति आमची निष्ठा असल्याचे शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. ( Nilesh Rane ) शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनीही नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे, नितेश राणे यांनी ठाकरे घराण्यावर सुरु असलेली टीका आता बंद करावी. देवेंद्र फडणवीसांना सांगून आम्ही ही टीका बंद करू असे वक्तव्य केसरकरांनी केले होते. मात्र, दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सुनावले आहे. दरम्यान, दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका. दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका, अस निलेश राणे म्हणाले आहेत.

दीपक केसरकर काय म्हणाले ? - शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीतून महाराष्ट्रात सरकार बनले आहे. त्यामुळे आता भाजप नेते विशेषतः राणे पुत्र आणि किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना नेते आणि ठाकरे घराण्यावरची टीका थांबेल का, असा प्रश्न विचारला असता त्यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाहीत, शिवसेना वाचवत आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मित्रपक्षांनी चुकीच्या पद्धतीने टीका टाळावी, अशी विनंती आम्ही केली आहे. किरीट सोमय्या यांनी आता अशी टीका करणार नसल्याचा शब्द दिला आहे. तसेच, नारायण राणे यांची मुलं लहान आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सांगून आम्ही त्यांनाही समजावून सांगू.. असे वक्तव्य केसरकर यांनी केले होते.

हेही वाचा - बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच! गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाष्य? वाचा, सविस्तर

Last Updated : Jul 13, 2022, 11:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.