ETV Bharat / state

कोरोनाचेही संकट गेल्याशिवाय राहणार नाही - शरद पवार

author img

By

Published : Jun 18, 2021, 10:05 PM IST

'राज्यावर ज्या ज्या वेळी संकटं आली, त्या त्या वेळी ती परतवून लावण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले आहेत. कोरोना संकटही गेल्या शिवार राहणार नाही. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून याच्यावर मात करू शकतो आणि कोरोना हद्दपार होऊ शकतो', असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग - 'एका मोठ्या संकटाचा सामान आपण सर्वजण करतो आहोत. एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून याच्यावर मात करू शकतो आणि कोरोना हद्दपार होऊ शकतो', असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (18 जून) व्यक्त केला.

'कोरोनाचे संकटही गेल्या शिवाय राहणार नाही'

सिंधुदुर्ग येथील जिल्हा समादेशक कार्यालय इमारतीमध्ये कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या निधीतून 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे. याचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले, की '1 जूनला राज्य शासनाकडे केंद्राचा प्रस्ताव आला. आज त्याचे लोकार्पण होत आहे. यातून प्रशासनाची गतीमानता दिसून येते. राज्यावर ज्या ज्या वेळी संकटं आली, त्या त्या वेळी ती परतवून लावण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सिजन उत्पादक घटक, शासन, प्रशासन, असे सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आपल्या सर्वांच्या अशा सामुदायिक प्रयत्नाने कोरोनाचे हे संकटदेखील गेल्या शिवाय राहणार नाही. निश्चितपणे प्रयत्न करून यातून बाहेर पडू'.

'पक्ष बाजूला ठेऊन कोरोनाशी लढा देऊया'

'समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सुविधा पोहोचली पाहिजे, हा संदेश घेऊन आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. पक्ष बाजूला ठेऊन कोरोनाशी लढा द्यायचा आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी हा लढा लढायचा आहे. शासन आपल्यासोबत आहे', असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर, पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, की 'पहिल्या लाटेत जिल्ह्याला सुस्थितीत ठेवण्यात यशस्वी झालो होतो. पक्षविरहित आम्ही सर्वजण जिल्ह्यासाठी काम करतोय. आजच्या कार्यक्रमात सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. आतासुद्धा जिल्हा कोरोनामुक्त होईल. चक्राकार पद्धतीने पदभरती झाली तर जिल्ह्याला डॉक्टरांची कमतरता भासणार नाही'. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन झाले.

हेही वाचा - कर्कश आवाज करणाऱ्या 104 बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोजर, वाहनाच्या काचेवर काळी फिल्म लावणाऱ्यांना दणका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.