ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक : नारायण राणे, नितेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क

author img

By

Published : Oct 21, 2019, 1:22 PM IST

मतदानानंतर नितेश राणेंना पोषक वातावरण आहे, तसेच आम्हाला 80 टक्के मतदान होईल, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला.

नितेश राणे

सिंधुदुर्ग - नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश यांनी कणकवलीत वरवडे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी राणे कुटुंबीय मतदान केंद्रावर दाखल झाले. कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

त्यांच्यापुढे शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे आव्हान आहे. त्यामुळेच येथील लढत ही संपूर्ण कोकणात हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे. दरम्यान, मतदानानंतर नितेश राणेंना पोषक वातावरण आहे, तसेच आम्हाला 80 टक्के मतदान होईल, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश यांनी कणकवलीत वरवडे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११.३५ मिनिटांनी राणे कुटुंबीय मतदान केंद्रावर दाखल झाले. कणकवली- देवगड विधानसभा मतदार संघातून नितेश राणे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यापुढे शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे आव्हान आहे. त्यामुळेच येथील लढत ही संपूर्ण कोकणात हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे. दरम्यान मतदानानंतर नितेश राणेंना पोषक वातावरण आहे. तसेच आम्हाला ८० टक्के मतदान होईल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. Body:बाईट: नितेश राणे
बाईट: नारायण राणेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.