ETV Bharat / state

Goa Political Crisis : काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी मुकुल वासनिक आज गोव्यात दाखल होणार - मुकूल वासनिक गोवा दौरा

काँग्रेसच्या ( Goa congress MLA ) 11 पैकी सहा आमदारांना भाजप प्रवेशाच्या हालचाली मागील दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. मात्र काँग्रेसचे फक्त सहा आमदार भाजपच्या ( congress MLAs in Goa BJP ) वाटेवर आहेत. अन्य पाच आमदारांना रोखण्यासाठी काँग्रेसने मागच्या दोन दिवसापासून प्रयत्न केले आहेत. या आमदारांना कायदेशीर व पक्षाच्या आदेशाला अनुसरून बाबींचे भय घालून रोखण्याचा प्रयत्न कालपर्यंत काँग्रेसने केला होता. मात्र यातील काही आमदार अजूनही फुटीच्या वाटेवरती आहेत.

मुकुल वासनिक
मुकुल वासनिक
author img

By

Published : Jul 11, 2022, 11:07 AM IST

पणजी- राज्यात सध्या मागच्या दोन दिवसापासून काँग्रेसचे आमदार बंडाच्या ( Congress MLAs in Goa ) तयारीत आहेत. राज्यात सध्या काँग्रेसचे 11 आमदार ( rebel in Goa Congress ) आहेत. त्यातील सहा आमदार भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप पाच आमदार काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी त्यांना रात्रीच अज्ञातस्थळी हलविले आहे. आता हे काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते मुकुल वासनिक आज दुपारपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत.

मायकल लोबोंना विरोधी पक्षनेते पदावरून हटविले-काँग्रेस आमदारांचा दोन तृतीयांश गट भाजपमध्ये विलीन करण्यासाठी विरोधी पक्षनेते मायकल लोबो व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पुढाकार घेतला होता. मात्र तूर्तास सहा आमदारांना आपल्या सोबत नेण्यास लोबो ( Michael Lobo rebel ) व कामत यशस्वी झाले आहेत. अन्य दोन आमदार आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न दोघेही नेते करत आहेत. हाच ठपका ठेवून काँग्रेस इन्चार्ज दिनेश गुंडूराव यांनी रविवारी मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवले आहे. तर दिगंबर कामत ( former chief minister Digambar Kamat ) यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसचे बंड रोखण्याचे आव्हान आता दिल्लीत- काँग्रेसचे 10 जुलैला 2019 साली या रात्री दहा आमदारांचा गट फुटून भाजपात दाखल झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती गोव्यात होणारा असल्याच्या चर्चा व तशी परिस्थिती सध्याच्या घडीला राज्यात आहे. काँग्रेसच्या 11 पैकी सहा आमदारांना भाजप प्रवेशाच्या हालचाली मागील दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. मात्र काँग्रेसचे फक्त सहा आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. अन्य पाच आमदारांना रोखण्यासाठी काँग्रेसने मागच्या दोन दिवसापासून प्रयत्न केले आहेत. या आमदारांना कायदेशीर व पक्षाच्या आदेशाला अनुसरून बाबींचे भय घालून रोखण्याचा प्रयत्न कालपर्यंत काँग्रेसने केला होता. मात्र यातील काही आमदार अजूनही फुटीच्या वाटेवरती आहेत. या आमदारांना रोखण्याचे आव्हान काँग्रेस समोर आहे. म्हणूनच दिल्लीतील काँग्रेस नेते मुकुल वासनिक आज गोव्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर पुढील बाबींवर चर्चा ते आमदारांसोबत करणार आहेत.

उपसभापती निवडीची अधिसूचना रद्द - गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी उपसभापती निवडीसाठी जारी केलेली अधिसूचना रद्द केली आहे. 12 जुलै रोजी निवडणूक होणार असताना रविवारी सकाळी ही अधिसूचना मागे घेण्याचे आदेश जारी करण्यात आले. विधानसभेच्या सचिव नम्रता उलमान यांनी सांगितले की, उपसभापती निवडीची अधिसूचना नियम ३०८ अंतर्गत ८ जुलै रोजी जारी करण्यात आली होती.

नाराज आमदार एकत्र - काँग्रेसचे आमदार अलेक्सिओ सिक्वेरा म्हणाले की, काही असंतुष्ट काँग्रेस आमदारांची नुकतीच मडगाव येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मला या बैठकीला हायकमांडने बोलावले नव्हते. या बैठकीला कोण उपस्थित होते याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेसचे किमान सात नाराज आमदार रणनीती आखण्यासाठी एका हॉटेलमध्ये भेटले. दरम्यान, गोवा विधानसभेच्या अध्यक्षांनी मंगळवारी होणारी उपसभापतीची निवडणूक पुढे ढकलली आहे. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत काँग्रेसचे सध्या 11 आमदार आहेत. यापैकी सुमारे आठ जण सत्ताधारी भाजपमध्ये दाखल झाल्याच्या अफवा आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.