ETV Bharat / state

सत्ताधाऱ्यांकडून वीज माफीच्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक; परशुराम उपरकर यांचा आरोप - Parshuram Uparkar slammed gov

मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले, की सध्याच्या राज्यकर्त्यांकडून जनतेची फसवणूक होत आहे. जनतेवर सातत्याने अन्याय करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परशुराम उपरकर
परशुराम उपरकर
author img

By

Published : Nov 19, 2020, 6:47 PM IST

सिंधुदुर्ग - मच्छिमार पॅकेजमध्ये साडेबारा कोटी आल्याचे सांगून आमदारांनी दिशाभूल केली आहे. पालकमंत्री, आमदार, खासदार फक्त घोषणा करत आहेत. घोषणेचे काय झाले? हे पाहत नाहीत. सत्ताधाऱ्यांकडून विज बिल माफीच्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपकर बोलत होते.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले, की सध्याच्या राज्यकर्त्यांकडून जनतेची फसवणूक होत आहे. जनतेवर सातत्याने अन्याय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवाळीपूर्वी गोड दिवाळी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. अवकाळी पावसातील भात नुकसान शेतकरी भरपाईसाठी ५ कोटी देण्याचे पालकमंत्री यांनी घोषणा केली. मात्र, अद्यापही पैसे नाहीत.

उर्जामंत्र्यांकडून लोकांना विजेचा शॉक

वीज बिल माफीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात आंदोलन छेडणात येणार आहे. त्यासाठी उद्या जिल्हा मनसेची महत्वाची बैठक कणकवलीत आयोजित करण्यात आली आहे. आमदार राज्याच्या प्रश्न आपणच सोडवला, असे दाखवितात. सांस्कृतिक कार्यक्रमाचे श्रेय घेतात. मुळात राज्याचा तो निर्णय आहे. दशावतारी नाटक हा एकच विषय नाही तर सरकारने संपूर्ण राज्यातील कार्यक्रम सुरू केले आहेत. वीज माफीबाबतीत सरकारने घोषणा केली. ३०० युनिट पेक्षा जास्त वीज बिल माफी करणे अशी घोषणा होती. आता वीजबिले भरा, असे सांगत उर्जामंत्र्यांनी विजेचा शॉक लोकांना दिला आहे.

सत्ताधारींनी केलेल्या घोषणाबाजीच्या बातम्यांची फलक लावणार -
मुंबईत मनसेची राज्यस्तरीय बैठक आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयानुसार जिल्ह्यातही आंदोलन केले जाईल. नागरिकांनी अशा आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना कर्ज काढून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची भाषा असते. मात्र, मूलभूत गरजा, अडचणीबद्दल कोणतेही उपाय योजना न करता काम केले जात आहे. सत्ताधारींनी केलेल्या घोषणाबाजीच्या बातम्यांची फलक लावणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.