सिंधुदुर्ग - कोरोनाग्रस्त रुग्णांवर प्लाझमा थेरपीद्वारे उपचार केल्यास रुग्ण लवकर बरे होतील. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लाझमा बँक तयार करून कोरोना रुग्णांवर उपचार करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्याकडे केली आहे. प्लाझमा बँकेचा प्रस्थाव शासनाला सादर करा, असे नितेश राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्लाझमा बँक महत्वाची आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे तर सुमारे 152 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना बाधितांवर उपचार होऊन बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरामध्ये कोरोना विरुध्द अँटीबॉडीज् तयार झालेली असते. त्यामुळे या रुग्णांच्या रक्तांमधील प्लाझमा जमा करुन त्यांची प्लाझमा बँक तयार करावी. त्यानंतर सध्याच्या व भविष्यातील रुग्णांवर प्लाझमा थेरपीद्वारे उपचार केल्यास पेशंट लवकर बरे होतील व जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होईल. तरी याप्रमाणे कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, असे आमदार नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच कणकवलीचा मुख्य बाजारपेठ परिसर सील