ETV Bharat / state

'सिंधुदुर्गसाठी मंजूर झालेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प कुठेही जाणार नाही'

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे होणारा आयुष मंत्रालयाचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही. यासंबंधी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार असल्याचे वृत्त हे खोटे आहे, असा खुलासा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Oct 16, 2020, 7:37 PM IST

सिंधुदुर्ग : दोडामार्ग-आडाळी येथे होणारा आयुष मंत्रालयाचा प्रकल्प कुठेही जाणार नाही. त्या संदर्भात माझी आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे कोणी काही सांगत असेल, तर ते चुकीचे आहे, असा खुलासा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, शासकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण झाली आहे. आता तेथील पदे भरण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - हिरण्यकेशी नदीत आढळली माशाची नवीन प्रजाती, तेजस ठाकरेंचा शोध

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे होणारा आयुष मंत्रालयाचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही. यासंबंधी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार असल्याचे वृत्त हे खोटे आहे. उमेदच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ नियुक्ती देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदचे खासगीकरण होणार नाही, असेही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले

यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्याचे संकेत दिले होते. ते पूर्ण केले आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या पद निर्मितीचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून त्यास लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असा मला विश्वास आहे. आंगणेवाडीच्या नळपाणी योजनेसाठी 22 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. भालचंद्र महाराज मठासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेस सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कणकवली, कुडाळ, मालवण नगरपालिकांनाही 5 ते 6 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

हेही वाचा - डायलॉगबाजी करणारे उदय सामंत यांना सांस्कृतिक खात्याचे मंत्री करा - नितेश राणे

जिल्ह्यात कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. ऑक्सिजन प्रकल्प सुरू झाला आहे. जिल्ह्यात रखडलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक, चिपी विमानतळाचे प्रश्न, विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे 40 कोटींचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व विश्रामगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी 20 कोटींचा निधी देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध असून जर फक्त टीकेला उत्तरच देत बसलो तर कामे कधी करणार, असे सांगून पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, विकास कामांसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. टीका करण्यापेक्षा काम करूया. मनात आणले तर विकास कामे झपाट्याने करता येतात हे मी घेतलेल्या निर्णयातून दिसून येते. जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा आणि कामे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि यापुढेही याच भूमिकेतून काम करत राहणार असल्याचे पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.