ETV Bharat / state

तळकोकणात पावसाचा जोर कायम; पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

तळकोकणात पावसाचा जोर कायम
author img

By

Published : Jul 12, 2019, 5:58 PM IST

Updated : Jul 12, 2019, 8:22 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक १२९ मिमी पावसाची नोंद झाली. तर पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

तळकोकणात पावसाचा जोर कायम

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. तर नालेदेखील तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक सखल भागात पाणी साठत आहे. तसेच सकाळी होडावडा येथे पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. दोडामार्ग तालुक्यातील कुसगेवाडी येथे डोंगर खचल्यामुळे माती रस्त्यावर आली. तसेच झाडेही रस्त्यावर उन्मळून पडली होती. सध्या या मार्गावरील माती व झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

तिलारी नदीची पातळी गुरुवारी सकाळी ८ वाजता ३८.८०० मीटर इतकी होती. तर कर्ली नदीची पातळी ६.००० मीटर आणि वाघोटन नदीची पातळी ३.५०० मीटर इतकी वाढली होती. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक राज्यमार्ग काहीकाळ ठप्प झाले होते.

गुरुवारी जिल्ह्यात सरासरी ७३.६२ मिलीमीटर इतका पाऊस झाला. दोडामार्ग ११३, सावंतवाडी ६८, वेंगुर्ला १२९, कुडाळ ८६, मालवण ५४, कणकवली ६७, देवगड १५ आणि वैभववाडी ५७ मिमी पाऊस झाला आहे.

तळकोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार (१५ जुलै) पर्यंत अती मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. पुढील ४ दिवस जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात समुद्रामध्ये साडेतीन ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा उठणार आहेत. तसेच वाऱ्याचा वेग हा ४० ते ५० किमी प्रती तास इतका राहणार असल्याने समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे समुद्रकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

देवघर धरणातून सुरू होणार पाण्याचा विसर्ग

कणकवली तालुक्यातील देवघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या धरणाच्या पाणीपातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. पाणीपातळी धरणाच्या उंबरठा पातळी म्हणजेच १७९.५० मीटरपेक्षा जास्त झाल्यानंतर धरणातून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार धरणातून विद्युत विमोचकाद्वारे शुक्रवारी (१२ जुलै २०१९) दुपारी १२ वाजता पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी जिवीतहानी टाळण्यासाठी नदीपात्रामध्ये उतरू नये तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक 129 मि.मी.पावसाची नोंद झाली. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.Body:मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. तर नाले देखील तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक सखल भागात पाणी साठत आहे. मुसळधार पावसामुळे सकाळी होडावडा येथे पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. दोडामार्ग तालुक्यातील कुसगेवाडी येथे डोंगर खचल्यामुळे माती रस्त्यावर आली. तसेच झाडेही रस्त्यावर उन्मळून पडली होती. सध्या या मार्गावरील माती व झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तिलारी नदीची पातळी आज सकाळी 8 वाजता 38.800 मीटर इतकी होती. तर कर्ली नदीची पातळी 6.000 मीटर आणि वाघोटन नदीची पातळी 3.500 मीटर इतकी वाढली होती. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पड झडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक राज्यमार्ग काहीकाळ ठप्प झाले होते.

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 73.62 मिलीमीटर इतका पाऊस झाला. दोडामार्ग 113, सावंतवाडी 68, वेंगुर्ला 129, कुडाळ 86, मालवण 54, कणकवली 67, देवगड 15 आणि वैभववाडी 57 मिमी पाऊस झाला आहे.Conclusion:तळकोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार दिनांक 15 जुलै 2019 पर्यंत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात समुद्रामध्ये साडे तीन ते साडे चार मीटर उंचीच्या लाटा उठणार आहेत. तसेच वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 कि.मी. प्रती तास इतका राहणार असल्याने समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे समुद्रकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

देवघर धरणातून सुरू होणार पाण्याचा विसर्ग

कणकवली तालुक्यातील देवघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या धरणाच्या पाणीपातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. पाणीपातळी धरणाच्या उंबरठा पातळी म्हणजेच 179.50 मीटर पेक्षा जास्त झाल्यानंतर धरणातून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार धरणातून विद्युत विमोचकाद्वारे शुक्रवार दिनांक 12 जुलै 2019 रोजी दुपारी 12.00 वा. पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनांनी जिवीत हानी टाळण्यासाठी नदीपात्रामध्ये उतरू नये तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Last Updated : Jul 12, 2019, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.