सिंधुदुर्ग: काँग्रेस नेते राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो (Bharat jodo yatra) यात्रा सुरू आहे. या यात्रेला महाराष्ट्र राज्यात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्रात दाखल झालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून प्रवास करत मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. या ठिकाणी देखील या यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळू लागला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत समाजातील विविध क्षेत्रातील लोक या यात्रेत सहभागी होत आहेत.
भाडोत्री कलाकार? दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी ही यात्रा मध्यप्रदेशात दाखल झाल्यानंतर या यात्रेत सहभागी होणाऱ्या कलाकारांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमदार नितेश आणि म्हणाले आहेत की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये दिसणारे जे कलावंत आहेत त्यांना पैसे देऊन आणलेले आहे असं एका एजन्सीच्या पाठवलेल्या मेसेज वरून सिद्ध होतं.
मध्यप्रदेशमध्ये कुठला कलाकार राहुल गांधींसोबत पंधरा मिनिटे चालू शकतो यासाठी इतके इतके पैसे आम्ही द्यायला तयार आहोत असा संदेश भारत जोडो यात्रेच्या टीमकडून काही एजन्सीना पाठविण्यात आला आहे. असे समोर आले आहे. ही जी काही नौटंकी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सुरू आहे. हे जे काही कलाकार येऊन 15 मिनिटे चालतात, राहुल गांधींना पाठिंबा देतात हे सगळे पैसे देऊन आणले आहेत का ? हा प्रश्न आता विचारला जातो आहे. अस यावेळी नितेश राणे म्हणाले आहेत.