ETV Bharat / state

Malvan Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनास गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला; तिघेजण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, एक अद्याप बेपत्ता - Tourist in Malvan beach

Malvan Tarkarli Beach : सिंधुदुर्गातील मालवणच्या तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या 11 मित्रांपैकी तिघेजण पाण्यात बुडाले. यातील दोघांना वाचवण्यात यश आलं असून एकाचा मात्र मृत्यू झालाय.

Malvan Tarakarli Beach
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 7:16 AM IST

सिंधुदुर्ग Malvan Tarkarli Beach : मालवणच्या तारकर्ली समुद्रात दुर्दैवी घटना घडली आहे. मालवणच्या तारकर्ली समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या 11 तरुणांपैकी तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली होती. मात्र यातील दोन तरुणांना वाचवण्यात नागरिकांना यश आलं आहे. यातील एक जण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हे तरुण कणकवली इथले असल्याची माहिती पुढं आली आहे. सुफियान दिलदार शेख (वय- २४) असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे. सुदैवानं दोन तरुणांना वाचावण्यात यश आलं आहे. त्यांच्यावर मालवण रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

कणकवलीतील तरुणांचं समुद्र किनाऱ्यावर पर्यटन : मिळालेल्या माहितीनुसार, साकेडी मुस्लीमवाडी कणकवली इथले शावेझ रियाझ शेख व चुलत भाऊ सुफियान दिलदार शेख तसंच झेद अब्दुल्ला शेख, मतीन हारुण शेख, अरबाज इम्तियाझ शेख, शहीद इरफान शेख, साहिल इरफान शेख, उस्मान हनिफ काझी, कतिल नाझीम काझी, युसूफ मुस्ताक काझी आणि मतीन याचा मित्र मेहबूब बाबु नदाफ असे एकूण 11 जणं मालवण समुद्र किनारी फिरण्यासाठी दुचाकीनं तारकर्ली पर्यटन केंद्र इथं आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ते समुद्रात उतरले. यातील सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरल्यावर ते वाहून जात असल्याचं पाहून साहिल शेख आरडा ओरडा करू लागला. साहिलचा आवाज ऐकताच सर्वजण त्या दिशेनं गेले. मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. त्यांनी अरबाज शेखला पाण्यातून बाहेर काढलं. त्यावेळी मतीन हा बुडू लागला असता, पाण्याच्या लाटेत किनाऱ्यावर आला. मात्र, सुफियान हा समुद्राच्या पाण्यात वाहून गेला. बराच वेळ त्याचा शोध सुरु होता. मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. तो अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात : पाण्यात बुडालेल्या अरबाज व मतीन या दोघांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र, अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर व अन्य घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा :

  1. Teacher Drown in Well : नवीन कार घेतलेल्या शिक्षकाचा कारसह विहिरीत बुडून मृत्यू, एका चुकीनं झाला अपघात
  2. Boat Capsizing In Indravati River: बोट उलटल्यानं सात जणांना जलसमाधी, कुठं घडली घटना?
  3. Five children died in Aurangabad : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.