सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज विविध ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. देवगडमध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी मार्गावर झाडे पडली होती.
कोकणात अवेळी पडणाऱ्या पावसाने सध्या आंबा, काजू बागायदारांचे मोठे नुकसान केले आहे. आज जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. सध्या कोरोनाच्या संकटामुळे आधीच बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आंबा पडून असताना त्याला रेल्वे पार्सल ट्रेनने हात दिला होता. यामुळे बागतदारांना थोडा दिलासा मिळाला होता. त्यात आता पावसामुळे बागायतदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.