ETV Bharat / state

'मिनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास सिंधुदुर्गात व्यावसायिकांचा मोठा उद्रेक' - भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

सरकारने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊन मध्ये शिथीलता न आणल्यास व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांचा मोठा उद्रेक होईल. अशी भीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केली आहे.

'मिनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास सिंधुदुर्गात व्यावसायिकांचा मोठा उद्रेक'

author img

By

Published : Apr 8, 2021, 3:21 PM IST

सिंधुदुर्ग - सरकारने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांचा मोठा उद्रेक होईल. अशी भीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केली आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे हवेतून येतात, पत्रकार परिषदा घेतात आणि निघून जातात. इथले प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न ते करत नाहीत, अशी टीका देखील राजन तेली यांनी बोलताना केली आहे.

'मिनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास सिंधुदुर्गात व्यावसायिकांचा मोठा उद्रेक'
व्यापारी वर्गामध्ये आहे प्रचंड असंतोष-
यावेळी बोलताना राजन तेली पुढे म्हणाले, आज कोरोनाची सात पुन्हा एकदा वाढत आहे. सरकारने पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लॉकडाऊन सुरू केले आहे. लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात उद्रेक आहे. सरकार कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मदत करत नाही. छोटे व्यापारी असतील, छोटे मच्छीमार असतील या ठिकाणचे रिक्षावाले असतील आज सगळ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. की आम्ही जगायचं कसं? आज इथल्या व्यापाऱ्यांमध्ये गेले दोन दिवस प्रचंड असंतोष आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक बाजारपेठेत लोक रस्त्यावर आले आहेत. प्रशासन आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष घडत आहे, असेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री हवेतून येतात आणि निघून जातात-
छोट्या छोट्या लोकांवर या लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पोलीस आणि जनता जिल्ह्यातले व्यापारी यांच्यामध्ये संघर्ष होत आहे. सरकारने याचा कुठेतरी विचार करायला हवा होता. जिल्ह्याचे पालकमंत्री हवेतून येतात पत्रकार परिषदा घेतात आणि निघून जातात. मात्र जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र बसूवून, इथल्या व्यापाऱ्यांना एकत्र बसून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून होत नाही, असा आरोप देखील यावेळी राजन तेली यांनी बोलताना केला आहे.
व्यापार्‍यांच्या मदतीसाठी पॅकेज दिले पाहिजे-
आज लोक सरकारच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. कोरोणाची दहशत तर आहेतच. परंतु सरकारच्या देखील दहशतीखाली आहेत. असे यावेळी तेली म्हणाले. लोकांना सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की, एक वर्ष आम्ही काढलं मात्र आता नुकसान सोसण्याची ताकद उरलेली नाही. सलून व्यवसायिक असतील, पर्यटन व्यावसायिक असतील, रिक्षा व्यवसायिक असतील सर्वांच कंबरडं या लॉकडाऊन मुळे मोडलेला आहे. असेही ते यावेळी म्हणाले. ज्यांचा हातावर पोट आहे त्यांनी करायचं काय? असा प्रश्न आहे. सरकारने इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारे मदत केली त्याच पद्धतीने छोटे-मोठे पॅकेज या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना दिलं पाहिजे होतं, असेही तेली म्हणाले आहेत.
व्यापारी वर्गाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे-
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील आपण सांगितलं या सगळ्या प्रकारात आपण स्वतः लक्ष घाला. इथल्या त्रस्त व्यापाऱ्यांना न्याय द्या. व्यापारी वर्ग एवढा त्रस्त आहे की त्यांना कर्जाचे हप्ते भरायला देखील पैसे नाहीत. बँका देखील थांबत नाहीत. त्यामुळे करायचे काय? असा प्रश्न या व्यापारी वर्गांमध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तसं मोठे पॅकेज दिलं तसं पॅकेज राज्यसरकारने इथल्या व्यापाऱ्यांना द्यावं. अशी आपण मागणी करणार आहोत, असेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले. सरकारने इथल्या व्यापाराला मदत केली नाही तर त्यांच्या होणाऱ्या उद्रेकाला सरकारने सामोरे जावे. भारतीय जनता पक्ष व्यापार्‍यांच्या पाठीशी उभा राहील असेही राजन तेली यावेळी म्हणाले.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांनी २८ दिवसांनी घेतला लसीचा दुसरा डोस, स्वीय साहाय्यकांनीही घेतला डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.