ETV Bharat / state

'गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या तपासणीसाठी पथके तैनात करणार' - sindhudurg corona news

गणेशोत्सवाला २२ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. गणेशोत्सव कालावधीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत जी नियमावली आहे त्यानुसारच जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे.

K. Manjulekshmi
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
author img

By

Published : Jul 31, 2020, 11:47 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नागरिक तसेच चाकरमान्यांच्या तपासणीसाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर १ ऑगस्ट पासून महसूल, पोलीस आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त पथके तैनात करण्यात येत आहेत. ज्या व्यक्ती संशयित आढळतील अशांच्या कोरोना रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

गणेशोत्सवाला २२ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. गणेशोत्सव कालावधीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत जी नियमावली आहे त्यानुसारच जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. नव्याने सूचना आल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लॉकडाऊनमध्ये शिथिलता न झाल्यास सद्यस्थितीत असेलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांची अंमलबजावणी करताना चाकरमानी आणि स्थानिक ग्राम नियंत्रण समितीमध्ये वाद होणार नाहीत याचीही दक्षता घेतली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

गणेशोत्सव कालावधीमध्ये दीड लाख चाकरमानी येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खारेपाटणसह जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या चेक नाक्यांवर महसूल, पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त पथके ठेवली जाणार आहेत. त्याठिकाणी संशयित वाटणाऱ्या म्हणजेच कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन स्वॅब टेस्टिंगला पाठवले जाणार आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या साडेतीनशेपर्यंत गेली आहे. बरे होणाऱ्या रुग्णाचेंही प्रमाण चांगले आहे. कोव्हिड सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्याठिकाणी रुग्णांशी संवादही साधला असता चागल्या प्रकारे उपचार होत आहे. जेवणही चांगले मिळत असल्याचे रूग्णांनी सांगितले, अशी माहिती जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. त्यामुळे रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चांगले असले तरीसुद्धा गणेशोत्सव काळात रुग्ण संख्या वाढली तर त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये 215 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास तालुक्याच्या ठिकाणीही व्यवस्था केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करतच आहे. सरपंच आणि ग्राम नियंत्रण समित्या चागले काम करत आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवता आले. आता गणेशोत्सव कालावधीमध्येही सर्वांकडून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील जनतेने आणि चाकरमानी यांनीही नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. गेल्या चार महिन्यात महसूल पोलीस आणि जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा यांनी अतिशय चांगला समन्वय ठेवून काम काम केले. त्याच पद्धतीने गणेशोत्सव काळात समन्वय ठेवून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.