ETV Bharat / state

जखमी गवा घुसला थेट लोकवस्तीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेळे गावातली घटना - सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील आंबोली जवळच्या गेळे गावात वस्तीजवळ आलेल्या गव्याला वनविभाग , वन्यप्रेमी आणि ग्रामस्थांनी जंगलात परत पाठविले. यात गव्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

सिधुदुर्गमध्ये लोकवस्तीत शिरला गवा
सिधुदुर्गमध्ये लोकवस्तीत शिरला गवा
author img

By

Published : Apr 4, 2021, 5:04 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील आंबोली जवळच्या गेळे गावात वस्तीजवळ आलेल्या गव्याला वनविभाग , वन्यप्रेमी आणि ग्रामस्थांनी जंगलात परत पाठविले. यात गव्याला कोणतीही दुखापत झाली नाही. ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्या समन्वयातून गव्याला नैसर्गिक अधिवासात पाठविण्यात यश आले. तरीही, या गव्याच्या डोळ्यांना इजा झाल्याने तो पुन्हा एकदा लोकवस्तीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या भागात वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गव्याला जंगलात सोडण्यास वन अधिकाऱ्यांना यश

चार दिवसांपासून लोकवस्ती जवळ भरकटत होता हा गवा
हा गवा चार दिवस आधीपासूनच वस्तीजवळच्या जंगलात भरकटत होता. त्याला नक्की वाट सापडत नव्हती. याचे कारण त्याच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे या गव्याला नीट दिसत नव्हतं. गावातले सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी आनंद गावडे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी वन्यजीव अभ्यासकांशी चर्चा सुरु केली. दृष्टी गेलेल्या गव्याला पुन्हा जंगलात पाठवायचं असेल तर काय करता येईल यावर विचार सुरु होते. हा गवा भरकटत भरकटत अगदी थेट वस्तीत आला. त्यानंतर ही घटना वनविभागाला कळविण्यात आली.

जखमी गवा
जखमी गवा

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीला सुरुवात

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले
वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आंबोलीचे वन्यजीव संचालक काका भिसे, वैद्यकीय अधिकारी आणि इतर पर्यावरण प्रेमींनी या गव्याचं जवळून निरीक्षण केलं. गव्याचं वयोमान पाहता त्याला बेशुध्द करून जंगलात सोडले असता, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. म्हणून ग्रामस्थांच्या मदतीने या गव्याला जंगलाकडे कसं वळवण्यात येईल यासाठी प्रयत्न करायचे ठरले. सर्वांच्या अथक प्रयत्नाने गव्याला जंगलाकडे वळवण्यात आलं.

हेही वाचा - 'महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे फडणवीसांना माहीत असायला पाहिजे'

गवा पुन्हा लोकवस्तीत येण्याची भीती
हा गवा जरी जंगलात गेला, तरीही त्याला दिसत नसल्यामुळे पुन्हा तो भरकटत वस्तीत येण्याची शक्यता आहे. म्हणून या गावात वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी पुणे शहरात असाच एक गवा भरकटत आला होता. मात्र त्या गव्याला पाहण्यासाठी जमलेली बघ्यांची गर्दी, गव्याला रेस्क्यू करण्यासाठी फसलेले वनविभागाचे ऑपरेशन यामुळे गव्याचा मृत्यू झाला होता. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गेळे गावात कोणत्याही सुविधा नसताना या ठिकाणी ग्रामस्थ आणि वनकर्मचारी यांच्या समन्वयातून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.