सिंधुदुर्ग - नैसर्गिक शेतीचे तज्ज्ञ डॉ. सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी प्रतिष्ठानद्वारे नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - सिंधुदुर्गमध्ये बचतगटाच्या महिलेकडून शिवभोजन थाळीचे उद्घाटन, पालकमंत्र्यांचीही उपस्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवन आनंदी आणि समृद्ध बनविणे हे कृषी प्रतिष्ठानचे ध्येय आहे. पौष्टिक, सकस अन्न निर्मिती ही आजची काळाची गरज आहे.
हेही वाचा - पालकमंत्री उदय सामंत घेणार 'जनता दरबार'
कृषी महाविद्यालयाच्या ओरोस येथील प्रक्षेत्रावर भेट देऊन नैसर्गिक शेतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राच्या फलकाचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सतीश सावंत, संदेश पारकर, कृषी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे सुधीर सावंत, कर्नल नरेश कुमार उपस्थित होते. प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक शेतीचा मुख्य घटक जीवामृत याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
हेही वाचा - सागरी क्षेत्रातील घुसखोरी रोखण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणार हायस्पीड नौका
नैसर्गिक शेतीच्या उपक्रमाला सर्वतोपरी शासन स्तरावर मदत करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी आश्वासन दिले. सावंत यांनी उभारलेला नैसर्गिक शेतीचा उपक्रम स्तुत्य व शेतकरी हिताचा आहे. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी नैसर्गिक शेती महत्वाची आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट अन्नाची निर्मिती होऊ शकते. या जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. हा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या पुढे जाणे गरजेचे आहे. सुधीर सावंत यांनी आंबा महोत्सव सुरू करून शेतकर्यांना आंबा विक्रीसाठी एक नवीन मार्केट उभे केले. रासायनिक शेती करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती करावी, असे आवाहन उपस्थितांना त्यांनी केले.
सावंत म्हणाले की, या देशातील वाढत्या अन्न उत्पादनाची गरज फक्त नैसर्गिक शेतीद्वारेच भागवता येईल. कारण रासायनिक शेतीमुळे जमिनी नापीक होते आणि त्यातून विषारी अन्न निर्माण होते. ज्यामुळे भारताच्या जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. डायबेटीस , कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब इत्यादी आजार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. कुपोषण आपल्या महिला आणि मुलांमध्ये भेडसावत आहे. म्हणून आम्ही पूर्ण देशात ही चळवळ उभारली आहे. त्यात कोकण आघाडीवर असले पाहिजे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने यांना मंजूरी देऊन शेतकर्यांना एक आशा दिलेली आहे. तरी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व आमदारांनी या चळवळीला ऊर्जित अवस्थेत आणावे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, कर्नल नरेश कुमार, संदेश पारकर,माजी आमदार पुष्पसेन सावंत, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. चांगदेव बागल, नागेंद्र परब, जान्वी सावंत, अतुल रावराणे त्तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव, दिनानाथ वेरणेकर, संचालक सुशांत नाईक, आबा मुंज, बाबू रावराणे आदी उपस्थित होते.