ETV Bharat / state

पाचव्या दिवशीही तळकोकणात मुसळधार; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती

जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे मात्र वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात तळकोकणात दाखल होत आहेत.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचे दृष्य
author img

By

Published : Jun 30, 2019, 7:19 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे मात्र वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात तळकोकणात दाखल होत आहेत. येत्या २४ तासात तळकोकणात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचे दृष्य

कणकवली, मालवण, वैभववाडी, कुडाळ आदी सर्वच तालुक्यात मुसळधार पावसाने रात्रीपासून कहर केला आहे. परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी नदी किनारील भागात पुराचे पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. तर शेतात देखील पुराचे पाणी घुसल्याने भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे वैभववाडीतील भुईबावडा तसेच करूळ घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे भुईबावडा घाटातून काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र, या घटनेचा करूळ घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला नाही. येत्या २४ तासात तळकोकणात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चौपदरीकरणाच्या चुकीच्या कामामुळे कणकवली शहर पाण्याखाली

सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराकडून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने भराव टाकला गेल्याने व नाले बुजवल्यामुळे प्रवाहाचा मार्ग बदलला आहे. त्यामुळे शहरातील महामार्गानजीकच्या सखल भागात पावसाचे पाणी साठल्याने कणकवली शहराचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याने त्यास तळ्याचे स्वरूप आले होते.

अनेक राज्यमार्ग काही काळ ठप्प

सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच आहे. मात्र शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणी आले आहे. काही ठिकाणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. यामध्ये मालवण- कणकवली, वेंगुर्ले- सावंतवाडी तसेच इतर राज्यमार्गांचा समावेश आहे.

मोबाईल नेटवर्क आणि विजेचा लपंडाव सुरू

वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरी भागात महावितरणकडून घेण्यात येणाऱ्या खबरदारीमुळे, तर ग्रामीण भागात तांत्रिक बिघाडामुळे बत्ती गुल होत आहे. ग्रामीण भागात वीज पुरवठा पूर्वव्रत होण्यास उशिर लागत असल्याने याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसाचा फटका मोबाईल नेटवर्कला देखील बसत आहे. यामुळे अनेक ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क गुल झाल्याने दूरध्वनी संपर्क तुटला आहे.

Intro:सिंधुदुर्गात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तर दुसरीकडे मात्र वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात तळकोकणात दाखल होत आहेत. Body:कणकवली, मालवण, वैभवाडी, कुडाळ आदी सर्वच तालुक्यात मुसळधार पावसाने रात्रीपासून कहर केला आहे. परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी नदी किनारील भागात पुराचे पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. तर शेतात देखील पुराचे पाणी घुसल्याने भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हाभरात पड झडीमुळे किरकोळ नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. Conclusion:मुसळधार पावसामुळे वैभववाडीतील भुईबावडा तसेच करूळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे भुईबावडा घाटातून काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती. तर करूळ घाटातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. येत्या चोवीस तासात तळकोकणाला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चौपदरीकरणाच्या चुकीच्या कामामुळे कणकवली शहर पाण्याखाली.

सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराकडून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने भराव टाकला गेल्याने तसेच नाले बुजवल्यामुळे प्रवाहाचा मार्ग बदलला गेलाय. त्यामुळे शहरातील महामार्गां नजीकच्या सखल भागात पावसाचे पाणी साठल्याने कणकवली शहराचा काही भाग पाण्याखाली गेला. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याने तळ्याचे स्वरूप आले होते.

अनेक राज्यमार्ग काही काळ ठप्प !

सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच आहे. मात्र शनिवारी मध्यरात्री पासून पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली. अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणी आले. काही ठिकाणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. यामध्ये मालवण- कणकवली, वेंगुर्ले- सावंतवाडी तसेच इतर राज्यमार्गांचा समावेश आहे.

मोबाईल नेटवर्क आणि विजेचा लपंडाव सुरू !

वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरी भागात महावितरणकडून घेणार येणाऱ्या खबरदारीमुळे तर ग्रामीण भागात तांत्रिक बिघाडामुळे बत्ती गुल होत आहे. ग्रामीण भागात वीज पुरवठा पूर्वव्रत होण्यास विलंब लागत असल्याने याचा मनस्थाप नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसाचा फटका मोबाईल नेटवर्कला देखील बसत आहे. अनेक ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क गुल झाल्याने दूरध्वनी संपर्क तुटला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.