ETV Bharat / state

सिंधुदुर्गात लाडक्या बाप्पाचे आगमन, भक्तांचा उत्साह शिगेला - सिंधुदुर्गात बाप्पाचे आगमन

घरगुती गणेशोत्सवामध्ये दोडामार्ग मध्ये ४८३४, बांद्यात २६५०, सावंतवाडीत ९९८५, वेंगुर्ला येथे ४९५२, निवतीत ३२७०, कुडाळमध्ये ८६०३, सिंधुदुर्गनगरीत २४२९, मालवणमध्ये ४५०५, आचरा येथे २४२५, देवगडमध्ये ६७१०, विजयदुर्गात २६५०, कणकवलीत ९७१०, तर वैभववाडीत ५३४५ अशा ६८ हजार ६८ कुटुंबात गणरायाचे पूजन केले गेले आहे.

Ganeshotsava begins strongly in Sindhudurg
सिंधुदुर्गात लाडक्या बाप्पाचे आगमन, भक्तांचा उत्साह शिगेला
author img

By

Published : Aug 22, 2020, 4:10 PM IST

सिंधुदुर्ग - यंदा कोरोनाचे सावट असले तरी तळकोकण म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह जोरात आहे. घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून यावर्षी गणेशमूर्ती लहान करण्याच्या सरकारच्या आवाहनाला कोकणवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ ठिकाणी सार्वजनिक, तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. कुडाळ येथील सिंधुदुर्गाचा राजा यासह ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दोडामार्ग ५, बांदा १, सावंतवाडी ६, वेंगुर्ला ३, कुडाळ ४, मालवण २, आचरा १, देवगड १, कणकवली ५ आणि वैभववाडी ४ असे ३२ सार्वजनिक गणेशोत्सव संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत आहेत.

सिंधुदुर्गात बाप्पाचे आगमन

घरगुती गणेशोत्सवामध्ये दोडामार्ग मध्ये ४८३४, बांद्यात २६५०, सावंतवाडीत ९९८५, वेंगुर्ला येथे ४९५२, निवतीत ३२७०, कुडाळमध्ये ८६०३, सिंधुदुर्गनगरीत २४२९, मालवणमध्ये ४५०५, आचरा येथे २४२५, देवगडमध्ये ६७१०, विजयदुर्गात २६५०, कणकवलीत ९७१०, तर वैभववाडीत ५३४५ अशा ६८ हजार ६८ कुटुंबांनी गणरायाचे पूजन केले आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. दरवेळी गणेशोत्सवाच्या एक-दोन दिवस आधी त्यांचे आगमन होत असे. मात्र यावर्षी उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तसेच काही चाकरमानी गेल्या १५ दिवसात दाखल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.