सिंधुदुर्ग - लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी मनसेचे कार्यकर्ते धावून आले. जिल्ह्यातील अंध आणि अपंग बांधवांना मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील अंध, अपंग आणि मतिमंद असलेल्या 350 कुटुंबाची यादी त्यांनी बनवली होती. सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्वच लोकांकडून दुर्लक्षित राहिलेला हा घटक असून त्यांना या वस्तूंची गरज आहे. हे लक्षात घेऊन आपण हे वाटप करत असल्याचे माजी आमदार उपरकर म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, दया मेस्त्री आदी उपस्थित होते.