ETV Bharat / state

शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी

author img

By

Published : Jul 7, 2021, 12:43 PM IST

Updated : Jul 7, 2021, 4:41 PM IST

बुधवारी नवी दिल्लीत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपाचे राज्यसभा सदस्य नारायणे राणे यांची मंत्री पदावर वर्णी लागली आहे.

नारायण राणे
नारायण राणे

सिंधुदुर्ग - शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. नारायण राणे यांचा एक शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नावाची मंत्री पदासाठी वर्णी लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या राजकीय प्रवासाचा लेखालोखा मांडणारे ईटीव्ही भारतचे हे विशेष वृत्त..

नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे गावात झाला. ते विशीत असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील चेंबूर मधून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1968 मध्ये ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर नगरसेवक, 'बेस्ट'चे अध्यक्ष आणि 1990 साली कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले.

शिवसेनेने मुख्यमंत्री केले-

महाराष्ट्रात घडलेल्या 1991 च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार नारायण राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे 1996 ला महसूल मंत्री झाले. या सरकारच्या शेवटच्या टप्यात मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात राणेंना मुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले.

शिवसेनाला सोडचिठ्ठी, आघाडीमध्ये महसूलमंत्री-

1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. यावेळी राणे विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. 2004 साली त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. मालवण विधानसभा मतदारसंघातून ते यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. त्यांची आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री पदी वर्णी लागली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निशाण फडकावले-

2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती त्यामुळे ते काँग्रसमध्येही स्वस्थ नव्हते. शेवटी राणेंनी काँग्रेस सोडली आणि 2018 मध्ये स्वतःचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपमध्ये विलीन झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा विलिनीकरण सोहळा पार पडला.

3 एप्रिल 2018 मध्ये नारायण राणे यांची भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणेंची एकहाती सत्ता आहे. राणे यांचे स्वतःचे सिंधुदुर्गात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि अत्याधुनिक हॉस्पिटल आहे.

Last Updated : Jul 7, 2021, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.