ETV Bharat / state

खासदार विनायक राऊतांना धमकी देणाऱ्या निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा; शिवसैनिकांची मागणी - खासदार विनायक राऊत बातमी

खासदार विनायक राऊतांना धमकी देणाऱ्या निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आज सिंधुदुर्गातील शिवसैनिकांनी कणकवली पोलिसांकडे निवेदन सादर केले आहे.

Shiv Sainik
शिवसैनिकांची मागणी
author img

By

Published : Feb 11, 2021, 6:45 PM IST

सिंधुदुर्ग - खासदार विनायक राऊतांना धमकी देणाऱ्या निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आज सिंधुदुर्गातील शिवसैनिकांनी कणकवली पोलिसांकडे निवेदन सादर केले आहे. दिसशील तिथे फटके खाशील, अशा शब्दात खासदार विनायक राऊतांना निलेश राणेंनी धमकीवजा इशारा दिला होता. त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शैलेश भोगले - शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख

पोलिसांना सादर केले निवेदन

माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी एका व्हिडीओ क्लिपव्दारे शिवसेना सचिव खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक विधान करून विनायक राऊत यांना मारहाण करणार अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने कणकवली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच याप्रश्नी शिवसेनेकडून काही विपरीत घडल्यास याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ही यावेळी दिला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सुजित जाधव, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सचिन सावंत, अँड हर्षद गावडे, राजु राठोड, युवासेनेचे गीतेश कडू आदी उपस्थित होते.

काय म्हणाले होते निलेश राणे

खासदार राऊत यांनी नारायण राणे आणि फडणवीसांवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जहरी टीकास्त्र सोडले आहे. तसेच विनायक राऊत यांनी स्वत:ची भाषा न बदलल्यास जिथे दिसेल तिथे फटके लावणार असल्याचा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला होता.

जिथे असशील तिथे फटके देईन-

खासदार राऊत यांनी नारायण राणे आणि फडणवीसांवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जहरी टीकास्त्र सोडले आहे. तसेच विनायक राऊत यांनी स्वत:ची भाषा न बदलल्यास जिथे दिसेल तिथे फटके लावणार असल्याचा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे. या संदर्भाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

हिंमत असेल तर राजीनामा द्यावा-

निलेश राणे व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना म्हणाले की, ''विनायक राऊत हे सामाजिक कार्यावर बोलणार नाहीत, त्यांनी नारायण राणे, फडणवीस यांच्यावर टीका केली.. मुळात ते मातोश्री़चे चप्पल चोर आहेत. स्वत: मोदी लाटेत निवडून आले.. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन आता निवडणुकीला सामोरे जावे आणि निवडून येतात का ते पाहावे, पण ती हिंमत ते दाखवणार नाहीत.''

'विनायक राऊत म्हणजे मातोश्रीचे थापा आहेत. ते स्वत: नॉन मॅट्रीक आहेत. संसदेत काय बोलतात त्यांचे त्यांना समजत नाही, वैयक्तीक आयुष्यातही त्यांचे गुण चांगले नाहीत'' खासदारकीचा एकही गुण नाही, अशीही टीका निलेश राणे यांनी एकेरी भाषेचा वापर करत केली आहे.

२०२४ ला खासदार राऊत यांना कोकणातून हद्दपार करणार

तसेच २०२४ च्या निवडणुकीत विनायक राऊत यांचा कायमचा बंदोबस्त करणार,त्यांना कोकणातून हद्दपार करणार असल्याचे आव्हान देतानाच, निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना भाषा बदलली नाही तर, ''जिकडे दिसशील तिकडे फटके देईन'', असा धमकीवजा इशाराही दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.