सिंधुदुर्ग - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र खासदार विनायक राऊत यांच्या हट्टीपणामुळे या प्रकल्पाला खीळ बसली आहे. त्यामुळे कोकणातील जनतेने या खासदाराला बॉयकॉट करावे, असे भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.
जिल्हा दौऱ्यावर आले असताना प्रमोद जठार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नाणार सारखे प्रकल्प व्हायलाच हवेत, त्याच्याशिवाय विकास होणार नाही. नाणारबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे आमदार हुसनबानू खलिपे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना नाणारची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील नाणार प्रकल्प कोकणात झाला पाहिजे, अशी इच्छा आहे. मात्र रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या हट्टीपणामुळे प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे कोकणातील जनतेने त्यांना बॉयकॉट करावे, असे त्यांनी जठार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'राहुल गांधींना राजकारण जमत नाही; बिहारवरून पुन्हा एकदा स्पष्ट'
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा अन्वय नाईक कुटुंबाशी जमीन व्यवहार; सातबारा केला शेअर