ETV Bharat / state

निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वाटप, आदिवासी बांधवाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत या आदिवासी बांधवांनी, लॉकडाऊनमुळे आपल्याला सध्या मजुरीची कामे मिळत नाहीत. तेव्हा शासनाने जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात, अशी मागणी केली आहे.

Distribution of substandard foodgrains to tribals sindhudurg
आदिवासींना निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वाटप
author img

By

Published : May 4, 2020, 5:57 PM IST

सिंधुदुर्ग - सध्या कोरोनाच्या संकटकाळात आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अनेक सामाजिक संस्थांकडून केले जात आहे. मात्र, सावली ट्रस्टच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आपल्या वस्तीतील अनेकांची तब्बेत बिघडली असल्याची तक्रार कणकवलीतील आदिवासी बांधव बबन बाळाराम पवार, यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.

तक्रारदार आदिवासी बांधव बबन बाळाराम पवार यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... संतापजनक..! दाम्पत्याला चक्क टॉयलेटमध्ये क्वारंटाईन, शौचालयातच दिले जेवण

कणकवलीतील गणपती साना येथील शांतीनगर भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या वतीने बबन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी, 'आपल्या महसूल विभागाचे कणकवलीचे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत सावली ट्रस्टच्या माध्यमातून शोषित मुक्ती अभियानचे उदय आईर यांनी वस्तीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वस्तूंमधील डाळ हि सडकी असून कांदे, बटाटे हे तर कुजलेले होते. आमच्या काही लोकांनी या वस्तू खाल्या असता अनेकांची तब्बेत बिघडली आहे. तरी आपण याची दाखल घ्यावी. दरम्यान आपल्याला धान्याची गरज असून शासनाने ते पुरवावे' असे या बांधवाने आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.