ETV Bharat / state

कोरोनाचा फटका : देवगड हापूस मुंबई मार्केटमध्ये गडगडला - देवगड हापूस

ऐन एप्रिल महिन्यातील हंगामातच हापूसचा दर गडगडला आहे. मुंबई मार्केटमध्ये सध्या चार ते पाच डझन पेटीला दोन हजार ते 3500 रुपये इतका दर मिळत आहे. दरम्यान मुंबई मार्केटमध्ये हापूस आंब्याचे दर गडगडले असले, तरी स्थानिक मार्केटमध्ये हापूस आंब्याचे दर आजही चढे आहेत.

हापूस आंबा
हापूस आंबा
author img

By

Published : Apr 18, 2021, 6:48 PM IST

सिंधुदूर्ग - आधीच उत्पादनात घट, त्यात यंदा कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका देवगड हापूसला बसला आहे. ऐन एप्रिल महिन्यातील हंगामातच हापूसचा दर गडगडला आहे. मुंबई मार्केटमध्ये सध्या चार ते पाच डझन पेटीला दोन हजार ते 3500 रुपये इतका दर मिळत आहे. दरम्यान मुंबई मार्केटमध्ये हापूस आंब्याचे दर गडगडले असले, तरी स्थानिक मार्केटमध्ये हापूस आंब्याचे दर आजही चढे आहेत.

आंब्याचे यावर्षी 50 टक्केच उत्पादन -

देवगड हापूस आंब्याचे यावर्षी 50 टक्केच उत्पादन आल्याने यावर्षी एप्रिलच्या ऐन हंगामात देवगड तालुक्यातून सुमारे 40 हजार आंबा पेट्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आल्या. दरवर्षी एप्रिल महिन्यात किमान 80 हजार पेट्या मार्केटमध्ये दाखल होतात. आवक कमी असताना देखील हापूस आंब्याचा दर गडगडला आहे. चार ते पाच डझन पेटीला दोन हजार ते 3500 रुपये इतका दर मिळत आहे.

तिसऱ्या टप्प्यातील हापूस उत्पादन वाढण्या ऐवजी कमी झाले -

देवगड हापूस उत्पादन कमी असल्याने कर्नाटक मधील आंबा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्याचा फटका देवगडला बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. देवगड हापूस आंबा हा रंग, चव आणि गंध या तीन गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे. देवगड हापूस आंब्याची अवीट गोडी असल्याने देवगड हापूस आंब्याचा चाहता वर्ग प्रचंड आहे. यावर्षी अवकाळी पाऊस व उशिरा मोहोर यामुळे हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये आंबा उत्पादन बऱ्यापैकी होते. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील हापूस उत्पादन वाढण्या ऐवजी कमी झाले. शेवटच्या टप्प्यात हापूस आंब्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आंबा बागायतदार वर्तवित आहेत. मात्र, शेवटच्या टप्प्यातील हापूसला दर कमी मिळण्याची शक्यता असून कॅनिंगला आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

स्थानिक मार्केटमध्ये हापूस आंब्याचे दर चढे -

मुंबई एपीएमसी मार्केटपेक्षा आंबा बागायतदार पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, गुजरात, औरंगाबाद, नाशिक, अकोला, बीड, बेळगाव आदी मार्केटमध्ये यावर्षी देवगड हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला. मुंबई मार्केटपेक्षा चांगला दर मिळत असल्याने आंबा बागायतदार मुंबई मार्केटमध्ये आंबा कमी प्रमाणात पाठवित आहेत. तसेच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील आंबा दलाल थेट आंबा बागायतदारांच्या बागेत येऊन आंबा उचल करीत आहेत. त्यामुळे आंबा बागायतदाराचा वाहतूक खर्च वाचत आहे. मुंबई मार्केटमध्ये हापूस आंब्याचे दर गडगडले असले, तरी स्थानिक मार्केटमध्ये हापूस आंब्याचे दर आजही चढे आहेत. स्थानिक मार्केटमध्ये देवगड हापूसच्या पाच डझन पेटीला चार ते पाच हजाराचा दर मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.