ETV Bharat / state

Kharepatan Naka : सिंधुदुर्गच्या खारेपाटण नाक्यावर लाकडाच्या गाड्या सोडण्यासाठी पैशांची मागणी; व्हिडीओ व्हायरल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण नाक्यावर वनविभागाकडून ( Sindhudurga Forest Department ) लाकडानं भरलेल्या गाड्या सोडण्यासाठी नियमबाह्य पैसे मागितले जात असल्याचा व्हिडीओ ( Kharepatan Naka ) सध्या समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील लाकूड व्यापारी असलेले राजेश कोलपटे यांनी या व्हिडिओ शेअर केला आहे.

Kharepatan Naka
Kharepatan Naka
author img

By

Published : Jan 11, 2022, 7:21 PM IST

रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण नाक्यावर वनविभागाकडून ( Sindhudurga Forest Department ) लाकडानं भरलेल्या गाड्या सोडण्यासाठी नियमबाह्य पैसे मागितले जात असल्याचा व्हिडीओ ( Kharepatan Naka ) सध्या समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील लाकूड व्यापारी असलेले राजेश कोलपटे यांनी या व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नियमानुसारदेखील पैसे भरल्यास वनविभागाचा तपासणी नाक्यावरील अधिकारी एक गाडी सोडण्यासाठी किमान 1500 हजार रूपये घेतो. शिवाय, पासची देखील राजरोसपणे विक्री करतो असा आरोप केला आहे.

एक गाडीसाठी किमान 1500 हजार रूपये -

रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील लाकूड व्यापारी असलेले राजेश कोलपटे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नियमानुसारदेखील पैसे भरल्यास वनविभागाचा तपासणी नाक्यावरील अधिकारी एक गाडी सोडण्यासाठी किमान 1500 हजार रूपये घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच आम्ही नियमानुसार पैसे भरतो त्यानंतर देखील आम्ही पैसे का द्यायचे? असा सवाल व्यापाऱ्यानं केला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पासवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांचा नंबर टाकत रत्नागिरी जिल्ह्यातील लाकूड तोडीनंतर मालवाहतुकीस मिळणारे पास त्या ठिकाणी वापरले जात असल्याचा गंभीर आरोप देखील व्यापाऱ्यानं केला आहे.

जवळपास महिनाभरापूर्वीचा आहे व्हिडीओ -

सध्या समोर आलेला व्हिडीओ हा जवळपास महिनाभरापूर्वीचा आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यासमोर काही रक्कम असून मोबाईलवरून त्याला ही रक्कम स्वीकारा अशी विनंती करताना एका व्यक्तीचं संभाषण आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तुला पास हवे का? किती हवेत मी देतो. असा दावा देखील संबंधित अधिकारी करत असल्याचे संभाषण व्हिडीओमध्यै कैद झाले आहे. संपूर्ण घटनेबाबत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील न्याय मागितला असून त्याबाबतचे पुरावे असल्याचा दावा देखील व्यापाऱ्याने केला आहे.

हेही वाचा - Sharad Pawar on Assembly Election : राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार, यूपीत सपाशी युती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.