सिंधुदुर्ग - ज्या राणेंना मराठीत दोन वाक्य साधी नीट बोलता येत नाहीत, त्यांची उद्धव ठाकरेंवर चिकलफेक करायची त्यांची लायकी नाही, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. राणेंकडे राजकीय प्रगल्भता नाही. तसेच राणेंनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहीजे, असेही ते म्हणाले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया राणेंनी ज्या ज्या योजना जाहीर केल्या, त्या एकही ते पूर्ण करू शकले नाहीत. विमानतळाची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, एक वीट ते रचू शकले नाहीत. ते विमानतळ अस्थित्वात आणण्याचे काम आम्ही केले. शेवटी लोकांना दाखवण्यासाठी काम करायचे नसते, असा टोलाही केसरकर यांनी राणेंना लगावला आहे. तसेच आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या तुलनेत सुद्धा तुम्ही टीकू शकत नाही. तसेच जे कोकणात रस्ते झाले ते सुद्धा सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आणले, तुम्ही पूर्ण केलेले एक तरी काम दाखवा, असे खुले आवाहन केसरकर यांनी राणेंना दिले. दहावर्षे मंत्री असताना तुम्ही स्वतःचे मेडीकल काॅलेज बांधले. मात्र, शासकीय मेडिकल कॉलेज आणले नाही, याचे उत्तर तुम्ही जनतेला दिले पाहीजे, असेही त्यांनी म्हटले. तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याच्या गोष्टी करता. मात्र, साधे सिंधुदुर्गाचे नेतृत्व तुम्ही करू शकत नाही, असेही ते म्हणाले.हेही वाचा - डॉ. शीतल आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात शोकाकूल वातावरणात अंत्यविधी