सिंधुदुर्ग - मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. गेले काही दिवस पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्यातील एक मध्यम, तर ७ लघू पाटबंधारे धरणांची पाणीपातळी १०० टक्क्यांवर पोहोचली आहे. तिलारी मोठा प्रकल्प, ३ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि २८ लघू पाटबंधारे धरणांमधील आजचा पाणीसाठा ५३.७० टक्के झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे.
मागील १५ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांशी छोटी धरणे भरुन वाहू लागली आहेत. सह्याद्री पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे कोर्लेसातंडी या मध्यम तर लघू पाटबंधारे असलेली आंबोली, हातेली, मांडखोल, निळेली, पावशी, हरकुळखुर्द, ओझरम आणि लोरे धरणात १००टक्के पाणीसाठा झाला आहे. तिलारी या मोठ्या प्रकल्पात ५८.१५ टक्के, देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात ५३.७४, अरुणा प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा झालेला आहे.
इतर छोट्या धरणांतील सध्याच्या पाणीसाठ्याची टक्केवारी
छोटी धरणे सध्याचा पाणीसाठा
- शिवडाव ९८.९४
- नाधवडे ६३.२६
- ओटव ५०.८७
- देदोनवाडी १०.२४
- तरंदळे २८.६३
- आडेली ७२.६७
- चोरगेवाडी ४३.५९
- ओरोसबुद्रुक १९.३७
- सनमटेंब ९५.८२
- तळेवाडी डिगस २५.८४
- दाबाचीवाडी ४५.१५
- शिरवल ६४.२१
- पुळास ९५.३८
- वाफोली ३७.७३
- कारिवडे २.४९
- धामापूर ४२.६५
- ओसरगाव ५२.२०
- पोईप ७०.६८
- शिरगाव १७.४५
- तिथवली ५३.२२