ETV Bharat / state

रत्नागिरीच्या नौकेवर चीनची व्हीटीएस यंत्रणा; सिंधुदुर्गात सुरक्षा यंत्रणेची उडाली झोप - Girya Sea water China VTS System Boat

गिर्ये गावाजवळच्या समुद्रात चायनीज व्हीटीएस यंत्रणा असलेली बोट सापडली. मात्र, ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून तिला पुढील तपास व कारवाईसाठी देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

China's VTS system on Ratnagiri ship
चीन व्हीटीएस यंत्रणा नाव सिंधुदुर्ग
author img

By

Published : Oct 3, 2021, 8:23 PM IST

सिंधुदुर्ग - गिर्ये गावाजवळच्या समुद्रात चायनीज व्हीटीएस यंत्रणा असलेली बोट सापडली. मात्र, ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून तिला पुढील तपास व कारवाईसाठी देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बोटीचे दृश्य

हेही वाचा - चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई

चीनी कंपनीच्या व्हीटीएस यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेची झोपच उडविली होती. कोस्टगार्डच्या जीपीएस लोकेशनमध्ये देवगड समुद्रात चीनी बोटींचा वावर असल्याचे निदर्शनास आले आणि सर्व सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. कोस्टगार्डने पोलीस यंत्रणेला संशयित चीनी बोटींचा शोध घ्या, अशा सूचना दिल्या व दोन्ही यंत्रणा कामाला लागली. सागर पोलीस विभागाने गस्ती नौकेने शोधमोहीम राबविल्यानंतर गिर्ये गावाजवळच्या समुद्रात चायनीज व्हीटीएस यंत्रणा असलेली बोट सापडली. मात्र, ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास व कारवाईसाठी देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

बोट दाऊद इब्राहीम साखरकर यांची

विशेष म्हणजे, ही नौका यांत्रिकी मच्छिमारी नौका आहे. मात्र, यावर पर्सनेट जाळी असल्याने, 'गोलमाल है बाबा सब गोलमाल है' अशी स्थिती झाली. देवगड समुद्रात चीनी बोटी असल्याचे लोकेशन कोस्टगार्डला जीपीएस यंत्रणेवर मिळाले. गेले दोन ते तीन दिवस या नौका देवगड समुद्रात असल्याचे समजल्यानंतर तत्काळ याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय व पोलिसांना देण्यात आली. दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्ती नौका नसल्याने सागर पोलीस विभागाकडे ही कामगिरी सोपविण्यात आली. नौकांचा शोध घेण्यासाठी सागर सुरक्षा देवगड शाखेची टीम सागरकन्या गस्ती नौकेने समुद्रात रवाना झाली. या टीममध्ये सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळूंखे, विशाल कराळे, तेली, पोलीस नाईक तांबे, पो.कॉ. निलेश पाटील यांचा समावेश होता. या टीमला रविवारी दुपारी १ च्या सुमारास गिर्ये पवनचक्कीसमोर ११.५ नॉटीकल मैलमध्ये चीनी कंपनीची व्हीटीएस यंत्रणा असलेली रत्नागिरी येथील दाऊद इब्राहीम साखरकर यांची नौका सापडली.

नौकेवर बेकायदा जाळी आणि साहित्य

या नौकेबरोबरच तेथील असलेल्या दोन नौका पसार झाल्या. पोलिसांनी या नौकेला देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले. या नौकेवर चीनी कंपनीची व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र या यंत्रणेचे भारतीय नोंदणीकरण करण्यात न आल्याने ही नौका चीनमधील असल्याचे जीपीएस यंत्रणेवर दिसत होते. यामुळे सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडाली व यंत्रणा संशयित चीनी बोटींचा शोध घेण्याच्या कामाला लागली. अखेर अशी यंत्रणा असलेली रत्नागिरी येथीलच बोट सापडली असून भारतीय रजिस्ट्रेशन न केल्यामुळे चीनची नौका असल्याची माहिती यंत्रणेला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ही नौका भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला.

नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर तपासणीअंती नौकेवर पर्सनेट जाळी आढळल्याने खळबळ उडाली. तसेच नौकेवर जनरेटर, १० पेक्षा जास्त कर्मचारी, जाळ्यांची लांबी - रुंदी नियमबाह्य असल्याचे आढळल्याने मत्स्यव्यवसाय विभाग त्यादृष्टिने तपासणी करून पुढील कारवाई करणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी दिली.

हेही वाचा - चिपी विमानतळ उड्डाणास सज्ज; 9 ऑक्टोबरला उद्घाटन, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.