ETV Bharat / state

चिपी विमानतळाचे उद्घाटन; नाव न घेता मुख्यमंत्री आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी नारायण राणे व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. 20 वर्षानंतर या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धघाटन झाले आहे.

narayan rane
narayan rane
author img

By

Published : Oct 9, 2021, 8:17 AM IST

Updated : Oct 9, 2021, 2:56 PM IST

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधीया, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणे आणि पर्यटनाचा विकास करणे या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात आले आहे. 274 हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीची आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅंडिगचीही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी नारायण राणे व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

'20 वर्षानंतर प्रकल्प पूर्ण' -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळ प्रकल्प आणला. राणे राज्यात सत्तेत असताना त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राणेंचा कुडाळ मालवण मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राणे सत्तेपासून दूर गेले. त्यानंतर आलेल्या शिवसेनेनेही हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळ बांधून पूर्ण होऊन 9 ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

ठाकरे राणे येणार एकत्र -

विशेष म्हणजे या विमानतळ उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गरज काय, असे नारायण राणे म्हणाले होते. मात्र, आज होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे नेमकी कोणती राजकीय जुगलबंदी या व्यासपीठावर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

10 हजार चौरस मीटरचे टर्मिनल -

या विमानतळावर 10 हजार चौरस मीटरचे टर्मिनल असून सुमारे 180 प्रवासी क्षमतेची विमाने या ठिकाणी उतरू शकतात. त्याशिवाय एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवरचे कामही पूर्ण झाले आहे. हा टॉवर विमानांना उतरण्यास आणि उड्डाणास मदत करतो. विमानांना दिशा कळवण्याचे कामही टॉवर करतो. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

जिल्ह्यात थेट पर्यटक येतील -

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हवाईमार्गे येणारे पर्यटक हे गोव्याकडे जातात. पण चिपीचे विमानतळ सुरु झाल्यानंतर थेट दिल्लीसारख्या महानगरातून जिल्ह्यात येणे पर्यटकांना सोपे जाणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि मासळीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या देशांतर्गतच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड हापूस आंब्याने मोठे नाव कमावले आहे. आंबा देशाच्या इतर भागांत आणि परदेशात निर्यात होऊ शकतो.

हेही वाचा - Cruise Drug Case : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Last Updated : Oct 9, 2021, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.