ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासमोर भाजपाचे आंदोलन; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोरोनामध्ये जिल्ह्याची स्थिती गंभीर झाल्याने शुक्रवारी (आज) भाजपाच्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीनी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर लक्षवेध आंदोलन छेडले. यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी राज्य सरकार, पालकमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला.

author img

By

Published : Jun 11, 2021, 8:17 PM IST

भाजपा आंदोलन
भाजपा आंदोलन

सिंधुदुर्ग - जिल्हा रेड झोनमध्ये गेल्याने आणि रोजचे वाढते मृत्यूचे प्रमाण याला पालकमंत्री आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपाने जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी आमदार अजित गोगटे आदींसह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हावासियांना योग्य सुविधा न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा, इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

जिल्हा रुग्णालयासमोर भाजपाचे आंदोलन

सरकारविरोधात घोषणाबाजी

कोरोनामध्ये जिल्ह्याची स्थिती गंभीर झाल्याने शुक्रवारी (आज) भाजपाच्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीनी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर लक्षवेध आंदोलन छेडले. यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी राज्य सरकार, पालकमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला. अखेर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी आम अजित गोगटे, रणजीत देसाई, सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, संजू परब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्यासह सर्वांना ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले

जिल्ह्यात वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाजपा लक्षवेधी आंदोलन करेल, असा इशारा कालच भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासमोर आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान कालच बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आंदोलन करण्यापेक्षा कोरोना काळात मदत करण्यासाठी भाजपाने समोर यावे, असे आवाहन केले होते. मात्र भाजपाच्या आंदोलनाने जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

हेही वाचा - राजकीय विशेषज्ञ प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यात खलबते,

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.