ETV Bharat / state

अमित शाहांच्या दौऱ्यानंतर सिंधुदुर्गात भाजपला धक्का, वाभवे-वैभववाडीतील 7 नगरसेवकांची भाजपला सोडचिट्ठी

author img

By

Published : Feb 9, 2021, 7:19 AM IST

Updated : Feb 9, 2021, 8:11 AM IST

जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाल्यानंतर या नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शाह यांच्या दौऱ्यानंतर जिल्हा भाजपत निर्माण झालेल्या उत्साहावर विरजण पडल्याचे बोलले जात आहे.

अमित शाहांच्या दौऱ्यानंतर सिंधुदुर्गात भाजपला धक्का, वाभवे-वैभववाडीतील 7 नगरसेवकांची भाजपला सोडचिट्ठी
अमित शाहांच्या दौऱ्यानंतर सिंधुदुर्गात भाजपला धक्का, वाभवे-वैभववाडीतील 7 नगरसेवकांची भाजपला सोडचिट्ठी

सिंधुदुर्ग - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर भाजपला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपची एकहाती सत्ता असलेल्या वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या ७ विद्यमान नगरसेवकांसह तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नितेश राणेंसह भाजपसाठी जिल्ह्यात हा मोठा धक्का समजला जात आहे.

शिवसेनेत करणार प्रवेश?

हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. हे सर्व जण मंगळवारी मुंबईला जाऊन अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. तालुकाप्रमुख मंगेश लोकेंनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेनेचा भाजपसाठी हा दे धक्का असल्याचेही बोलले जात आहे.

भापजपची होती एकहाती सत्ता
विशेष म्हणजे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपची एकहात्ती सत्ता होती. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात या नगरपंचायतीत भाजपचे कमळ फुलविण्यात पक्षाला यश आले होते. आता लवकरच नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे आमदार नितेश राणेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वाभवे-वैभववाडीचे पहिले नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, संपदा राणे, दीपा गजोबार हे चार माजी नगराध्यक्ष आणि विदयमान नगरसेवक संतोष पवार, रविंद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर हे तीन नगरसेवक तसेच भाजप वैभववाडी बुथप्रमुख संतोष निकम, शिवाजी राणे, दीपक गजोबार अशा एकूण १० जणांनी एकत्रितपणे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

शाहांच्या दौऱ्यानंतर सोडला पक्ष
विशेष म्हणजे जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाल्यानंतर या सर्वांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शाह यांच्या दौऱ्यानंतर जिल्हा भाजपत निर्माण झालेल्या उत्साहावर विरजण पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यानंतर भाजपचे वैभववाडी प्रभारी जयेंद्र रावराणे यांनी पक्षाची तातडीची बैठक बोलाविली आहे. आमदार नितेश राणे हेही जिल्ह्यात असून त्यांनीही या घटनेचा आढावा घेतला आहे.

हेही वाचा - पवित्र युती सोडून शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली; अमित शाहांचा हल्लाबोल

Last Updated : Feb 9, 2021, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.