ETV Bharat / state

..तर पैसे मोजायला हात शिल्लक राहणार नाहीत, आमदार नितेश राणेंचा डॉक्टरांना इशारा - सिंधुदुर्ग आमदार नितेश राणे

शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याची हिंमत डॉक्टरांना होता कामा नये. तसे झाल्यास पैसे मोजायला हात शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी आज दिला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना नोटीस बजावली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Nov 24, 2020, 8:40 PM IST

सिंधुदुर्ग - गोरगरिबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालये आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याची हिंमत डॉक्टरांना होता कामा नये. तसे झाल्यास पैसे मोजायला हात शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी आज दिला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना नोटीस बजावली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कक्षामध्ये रुग्णांना भेडसावणार्‍या समस्यांच्या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक मेघा गांगण, शिशीर परुळेकर, बबलू सावंत, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, संतोष पुजारे, नितीन पाडावे, अजय घाडी आदी उपस्थित होते.

चौकशी करून योग्य ती कारवाई करा

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालयातील समस्यांबाबत बैठकीच्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आठ दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सतीश टाक यांनी एका व्यक्तीकडून दाखल्यासाठी २०० रुपये घेतल्याचा व्हिडिओ केला होता. तो मुद्दा आजच्या बैठकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी मांडताच आमदार नीतेश राणे यांनी हा इशारा दिला. तसेच या प्रकरणी संबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई करा, अशा सूचनाही राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सहदेव पाटील यांनी संबंधित डॉक्टरांना नोटीस देण्यात येईल, असे सांगितले. एनआरएचएमअंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी केली. मात्र, यापूर्वी जिल्हा रुग्णालयात ही सुविधा नसल्याने एनआरएचएमअंतर्गत खर्च करण्यात येत होता. आता जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सिटीस्कॅन करून घेता येणार असल्याची माहिती डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनी दिली. तर कणकवलीहून ओरोस येथे जाण्यासाठी होणारा खर्च व त्रास वाचविण्याच्या दृष्टीने ही उपाय योजना उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा पाढा

कोविडच्या नावाखाली जिल्हा नियोजनला आलेल्या निधीतील २३ कोटींचा निधी तुम्ही खर्च कुठे केला? उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा पाढा असताना येथे रक्कम खर्च झाली नाही. मग ते २३ कोटी शोकेसमध्ये ठेवले आहेत का? ते रुग्णांच्या सेवेसाठी बाहेर काढा, अशी आक्रमक भूमिका नितेश राणे यांनी मांडताच सिटीस्कॅनच्या मुद्द्याबाबत आपण पत्र द्या वरिष्ठांकडे सदर प्रश्न मांडतो अशी भूमिका डॉक्टर चव्हाण यांनी घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.