ETV Bharat / state

Nitesh Rane Threat : नितेश राणेंपासून जीवाला धोका, शिवसेनेच्या नगराध्यक्षांचा खळबळजनक दावा - साक्षी प्रभू

प्रभू (Mayor of Devgad Sakshi Prabhu) या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष आहेत आणि आमदार राणे हे आपल्याला भाजपात येण्यासाठी दबाव टाकत असून भाजपात न आल्यास आपल्याला बदनाम करू अशी धमकी दिल्याचे त्यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.(Nitesh Rane threaten Mayor).

Nitesh Rane Threat
Nitesh Rane Threat
author img

By

Published : Nov 28, 2022, 4:31 PM IST

Updated : Nov 28, 2022, 5:43 PM IST

सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात देवगडच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू (Mayor of Devgad Sakshi Prabhu) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्याला धमकी दिल्याचे साक्षी प्रभू यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. (Nitesh Rane threaten Mayor). प्रभू या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष आहेत आणि आमदार राणे हे आपल्याला भाजपात येण्यासाठी दबाव टाकत असून भाजपात न आल्यास आपल्याला बदनाम करू अशी धमकी दिल्याचे त्यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.

नगराध्यक्ष साक्षी प्रभू

फोनवरून धमकी : देवगडच्या नगराध्यक्ष साक्षी गजानन प्रभू यांनी देवगड पोलीस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, "मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडून आली आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेते व देवगडचे आमदार नितेश राणे यांच्याकडून व त्यांच्या कार्यकत्यांकडून माझ्यावर मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून भाजप पक्षामध्ये प्रवेश करावा असा दबाव टाकला जात होता. प्रथम काही दिवस मी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. 7 नोव्हेंबरला दुपारी 12.30 च्या सुमारास माझ्या घरी भाजप नगरसेविका प्रणाली माने व त्यांचे पती मिलिंद माने हे दोघे आले. त्यांनी मला त्यांच्या मोबाईल वरून आमदार राणे यांच्याशी बोलणे करून दिले. त्या वेळेस आमदार राणे यांनी मला धमकी दिली की तुम्ही पुढील 10 दिवसात शिवसेना सोडून भाजप पक्षात प्रवेश करावा. अन्यथा आम्ही तुम्हाला बदनाम करायला सुरुवात करणार आहोत".

साक्षी प्रभू यांची तक्रार
साक्षी प्रभू यांची तक्रार

भाजपात आल्यास 25 लाख देऊ : त्या पुढे म्हणतात, "मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी मला सांगितले की तुम्ही खोटी बिले काढली आहेत असा मी आरोप करणार आहे. त्यात तुम्हाला आणि तुमच्या बाकीच्या नगरसेवकांना अडकवणार असा खोटा व खोडसाळ आरोप माझे तसेच माझे सहकारी नगरसेवक यांचेवर करणार असे मला सांगितले. तसेच तुम्ही भाजप मध्ये आल्यास तुम्हाला 25 लाख रुपये देऊ शिवाय नगराध्यक्षपदही देऊ अशी मला ऑफर दिली होती. परंतु मी त्यांना स्पष्ट नकार दिला. मला शिवसेनेशी एकनिष्ठ राहायचे आहे असे मी माने दाम्पत्याला सांगितले असता त्यांनी सुद्धा मला तुमच्या जीवाचे बरे वाईट होईल असे सांगितले."

साक्षी प्रभू यांची तक्रार
साक्षी प्रभू यांची तक्रार

राणेंवर कायदेशीर कारवाई करावी : मोबाईल वर कॉल करून मला पक्ष सोडायला दबाव टाकल्याप्रकरणी आमदार नितेश राणे, नगरसेविका प्रणाली माने आणि मिलिंद माने यांच्यावर एका महिलेच्या घरी जाऊन धमकी दिल्या प्रकरणी तसेच मोबाईल वरून संभाषण करून पक्ष सोडायला दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच आमच्या जीवाचे काहीही बरे वाईट झाल्यास त्याला आमदार नितेश राणे, नगरसेविका प्रणाली माने आणि मिलिंद माने यांना जबाबदार धरण्यात यावे, असे प्रभु यांनी अर्जात म्हटले आहे.

Last Updated : Nov 28, 2022, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.