ETV Bharat / state

'हे महाराजा.. ह्यो कोरोना नष्ट कर, नायतर तुझ्या सेवेक कोण नसतलो..'

सिंधुदुर्गातील वैशिष्यपूर्ण उत्सव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. या गावात आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा पहायला मिळते. यावर्षी या ठिकाणी देवाला घातलेल्या गाऱ्हान्यातून थेट देवालाच धमकी देण्यात आली आहे. "ह्यो कोरोना नष्ट कर नायतर तुझ्या सेवेक कोण नसतलो" असे सांगत येथील गावकऱ्याने थेट देवालाच आव्हान दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

special Shimgotsav in Sangeli village in Sawantwadi

author img

By

Published : Apr 4, 2021, 3:41 PM IST

Updated : Apr 4, 2021, 4:24 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवणी माणूस हा जेवढा भोळाभाबडा, तेवढा परखड असल्याचे समजले जाते. सध्या जिल्ह्यातील गावागावात होळी उत्सव सुरू आहे. यानिमित्त देवाच्या मांडावर देवाचे वार्षिक साजरे होत आहे. असाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैशिष्यपूर्ण उत्सव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. यावर्षी या ठिकाणी देवाला घातलेल्या गाऱ्हान्यातून थेट देवालाच धमकी देण्यात आली आहे. "ह्यो कोरोना नष्ट कर नायतर तुझ्या सेवेक कोण नसतलो" असे सांगत येथील गावकऱ्याने थेट देवालाच आव्हान दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैशिष्ट्यपूर्ण सांगेली गावातील शिमगोत्सव -

सिंधुदुर्गातील वैशिष्यपूर्ण उत्सव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. या गावात आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा पहायला मिळते. या गावात देव म्हणून फणसाच्या झाडाला गोलाकार आकार दिला जातो. होळीच्या पूर्वसंध्येला त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर मध्यरात्री विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. होळी म्हणून गावात ग्रामदेवतेची प्रतिष्ठापणा केली जाते. सांगेली गावचे ग्रामदैवत झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. या देवाला गिरीजानाथ किंवा गिरोबा असं संबोधलं जातं.

सावंतवाडीतील वैशिष्येपूर्ण शिमगोत्सव
गावकर्‍याने थेट देवालाच दिले आव्हान -
येथे दरवर्षी होळीच्या आदल्या दिवशी पासून जिल्ह्यात शिगमोत्सव सुरू होतो. मात्र कोरोनामुळे होळी सणावर निर्बंध घातले असल्याने गावकऱ्यांनी गिरोबाला मालवणी पध्दतीने गाऱ्हाणे घातले आहे. कोरोनाचा नायनाट जगातून होऊ देत, यासाठी गिरोबाला साकडे घालण्यात आले. या गाऱ्हान्यातून येथील गावकर्‍याने थेट देवालाच आव्हान दिले आहे. हा कोरोना नष्ट झाला नाही तर येथील माणसे जगणार नाहीत. त्यामुळे तुझ्या सेवेला कोणीही उरणार नाही. म्हणून हा कोरोना जगातून नष्ट कर. असे या गाण्यात म्हटले आहे. मालवणी भाषेतील हे गाऱ्हाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे मालवणी भाषेतले हे गाऱ्हाणे -
कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील ग्रामदेवतांसमोर गावकर गाऱ्हाणे घालतो. या गाऱ्हान्यातून आपली व्यथा, आपले मागणे देवासमोर मांडले जाते. यावर्षी कोरोनाने थैमान घातलेले पाहता होळीच्या मांडावर कोरोनाचा नायनाट व्हावा याकरिता सर्वच ठिकाणी गाऱ्हाणे घालण्यात आले. परंतु सांगेलीमध्ये प्रसिद्ध गिरोबाला घातलेले गाऱ्हाणे विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. मालवणी भाषेतल्या या गाऱ्हान्यातून आपलीच नाही तर सगळ्या जगाची व्यथा या देवासमोर मांडण्यात आली आहे. चीनमधून आलेला हा कोरोना संपूर्ण जगात थैमान घालत आहे. तो आला आहे की सोडला आहे हे तुलाच माहीत आहे. तसेच कोरोनाची अफवा आहे की कोरोना आहे हे देखील तुला माहित आहे. माणसं मेलीत ती कोरोनाने मेली की अन्य कोणत्या आजाराने मेली हे तुला आणि त्या लोकांना तपासणाऱ्या डॉक्टरनाच माहीत आहे. त्यामुळे खरं खोटे काय आहे हे तूच समजून या कोरोनाचा नायनाट कर. असे देखील या गाऱ्हान्यात म्हटले आहे.

Last Updated : Apr 4, 2021, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.