ETV Bharat / state

साताऱ्यात दारू दुकाने उघडल्याचा परिणाम; डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

दारू पित असताना मृत सूरज निगडे आणि खून प्रकरणातील संशयित दिपक दया यांच्यात वाद झाला. या वादातून सूरज याचा खून केल्याचे दिपक दया याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर होत कबूल केले आहे.

Satra Taluka Police Station
सातारा तालुका पोलीस ठाणे
author img

By

Published : May 14, 2020, 10:06 AM IST

सातारा - दारू दुकाने उघडून काही तास उलटत नाहीत तोच दारूच्या नशेत असणाऱ्या सदर बझारमधील तरुणाचा काल रात्री साता-याजवळ खून झाला. खून प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे

dipak dya
संशयित आरोपी दिपक दया

सूरज मारुती निगडे (वय 27,रा. करिश्मा हाईट, सदरबझार) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दिपक विश्वनाथ दया (वय 28, मूळ रा. नाशिक, सध्या वाढेफाटा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो महामार्गावर एका ढाब्यावर काम करतो. तेथेच त्याची मृत युवकाशी ओळख झाली होती.

बुधवारी रात्री ते आणखी एका मित्रासह वाढेफाट्याजवळ वेण्णा नदीच्या बाजूस दारू पित बसले होते. काही वेळात तिसरा मित्र उठून गेला. त्यानंतर दोघांत सायकल देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाला. शिवीगाळ सुरू झाल्यानंतर प्रकरण हमरीतुमरीवर गेले.

रागाच्या भरात आणि दारुच्या नशेत दीपकने सूरजच्या डोक्यात दगड घालून खून केला. पहाटे संशयित युवक पोलिसांपुढे स्वत:हून हजर झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सज्जन हंकारे, सहायक निरीक्षक अमित पाटील, हवालदार राजू मुलाणी अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.