सातारा : मित्रांबरोबर मसाले भाताची पार्टी करणे एका १८ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले (young man died of shock in Satara) आहे. जेवण करण्यासाठी विहिरीतून पाणी आणायला गेल्यानंतर शॉक लागून त्याचा मृत्यू झाला (young man went to fetch water) आहे. यश गणेश चिकणे, असे त्याचे नाव आहे. जावळी तालुक्यातील सोनगाव येथे ही घटना घडली.
वीजेचा धक्का बसला : यश चिकणे आणि त्याचा लहान भाऊ आयुष चिकणे तसेच संकेत चिकणे, सत्यम चिकणे, विशाल पवार, कुणाल चिकणे (सर्व रा. सोनगाव) हे सर्वजण मसाले भाताची पार्टीं करण्यासाठी आर्डे नावाच्या शिवारात गेले (died of shock in Satara) होते. जेवणासाठी पाणी आणायला यश चिकणे हा उमेश काटकर यांच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेला. विहिरीच्या लोखंडी गजाच्या पायरीवर पाय ठेवताच त्याला विजेचा धक्का लागल्याने पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भाताची त्याच्या जीवावर बेतली. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस नाईक शेख हे तपास करीत (young man died of shock) आहेत.