कराड (सातारा) - ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावरील श्री सदाशिव मंदिर आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. यामुळे महाशिवरात्रदिनी होणारी यात्राही रद्द झाली आहे. भाविकांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचा अॅक्सेस कराड शहर पोलिसांनी घेतला असून पोलीस ठाण्यातून मंदिर परिसरावर पोलिसांची नजर असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड येथील श्री सदाशिव मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मनाई आदेश लागू केला आहे. आजपासून तीन दिवस मंदिर बंद राहणार आहे. महाशिवरात्रदिनी सदाशिवगडावर होणारी यात्राही रद्द करण्यात आली आहे. श्री सदाशिव मंदिर परिसरात असणार्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचा अॅक्सेस पोलिसांनी घेतला आहे. त्याद्वारे कराड शहर पोलीस ठाण्यातून मंदिर परिसरावर पोलीस नजर ठेवणार आहेत. प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.