सातारा - वाई तालुक्यातील वहागाव येथील वनविभागच्या राखीव क्षेत्रात २ मार्च २०१९ रोजी वणवा लागला होता. तपासात हा वणवा विंड वर्ल्ड इंडिया (इनरकॉन) कंपनीच्या विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सिध्द झाले. विंडवर्ल्ड इंडिया कंपनीमार्फत योग्य त्या उपाययोजना न राबविल्यामुळे ११ हेक्टर वनक्षेत्रावर वणवा लागल्यााच ठपका ठेवत, न्यायालयाने कंपनीला ५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
सहाय्यक अभियंत्याने भरला दंड
वणव्या प्रकरणी या कंपनीवर वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वाई न्यायालयाने कंपनीला 5 हजारांचा दंड ठोठावला. कंपनीच्या वतीने सहाय्यक अभियंत्याने हा दंड भरला आहे.
वनविभागाचे आवाहन
वणवा लावल्यामुळे जंगलाची निसर्ग संपदेची हानी होवून पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे वणवा लावणे अपराध असून, तो सिध्द झाल्यास पाच वर्षे कैद किंवा पाच हजार रुपये दंड होवू शकतो. त्यामुळे राखीव वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, वणवा लावणे, शिकार करणे यांसारखे गुन्हे करुन नयेत, असे आवाहन वन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.