ETV Bharat / state

कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीवर मोर्चा काढणार -सदाभाऊ खोतांचे बेताल वक्तव्य - रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा निर्णय घेऊन पुरवठा सुरळीत केला नाही. तर कोरोनाग्रस्त व नातेवाईकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.

कोरोनाग्रस्तांना घेऊन मोर्चा
कोरोनाग्रस्तांना घेऊन मोर्चा
author img

By

Published : Apr 19, 2021, 1:01 PM IST

Updated : Apr 19, 2021, 3:17 PM IST

सातारा - रेमडेसिवीर औषध कंपन्यांची राज्य सरकारने मुस्कटदाबी केल्याने महाराष्ट्रात इंजेक्शनचा तुटवडा आहे. येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा निर्णय घेऊन पुरवठा सुरळीत केला नाही तर मंगळवार दि.२० रोजी कोरोनाग्रस्त व नातेवाईकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.

मातोश्रीवर मोर्चा काढणार

कमिशनसाठी तुटवडा.....

साताऱ्यात पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, प्रकाश उर्फ सोनू साबळे, शंकर शिंदे उपस्थित होते. 'सरकारच्या आडमुठेपणामुळे तेथील लोकांना कमिशन खायचे आहे. म्हणून राज्यात रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा झाला आहे.' अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला.

सरकारने रुग्णांना दिलासा द्यावा....

खोत म्हणाले, एका बाजूला राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण केल्याने नागरिकांचे बळी जात आहे. दुसऱ्या बाजूला औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांना रेमडेसिवीर खरेदीत केवळ कमिशन खायचे असल्याने खरेदी थांबवली आहे. कंपन्यांनी इंजेक्शन केवळ राज्य सरकारलाच विकायचे असा फतवा काढला आहे. त्यामुळे कंपन्यांना ते इंजेक्शन मेडीकल दुकानदारांना थेट विकता येत नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकत नाही, ही बाब संतापजनक आहे. सरकारने स्वतः तात्काळ इंजेक्शन खरेदी करावीत. तसेच खासगी मेडीकल दुकानदारांनाही विकण्याची मुभा कंपन्यांना द्यावी. जेणेकरून रुग्णांना दिलासा मिळेल.

खंडण्या गोळा करण्याचे थांबवा....

जनता मृत्यूच्या दारात असताना सरकारने खंडण्या गोळा करणे थांबवावे. सरकार केवळ कमिशन आणि खंडणीसाठी सर्वसामान्य जनतेचे जीव घेणार असेल तर रयत क्रांती संघटना औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे पुतळे जाळणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरावर कोरोनाग्रस्त व नातेवाईकांना सोबत घेवून मोर्चा काढेल, असा इशाराही खोत यांनी दिला.

Last Updated : Apr 19, 2021, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.