ETV Bharat / state

Whale vomit: साडेपाच कोटीचे अंबरग्रीस साताऱ्यात जप्त; कोल्हापूर, रत्नागिरीतील चौघांना अटक - चौघा तस्करांना अटक

व्हेल माशाची उलटी विक्री करण्याचे प्रमाण वाढत आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून तब्बल साडे पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. याप्रकरणी कोल्हापूर आणि रत्नागिरीतील चौघा तस्करांना अटक करण्यात आली आहे.

Satara Four arrested from Kolhapur Ratnagiri
साडे पाच कोटीची व्हेल माशाची उलटी केली जप्त
author img

By

Published : May 10, 2023, 4:07 PM IST

सातारा : व्हेल मासा संरक्षित प्राणी असल्याने उलटीचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत आहे. शहरात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून आलेल्या चौघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून पकडले. संशय येऊ नये म्हणून चौघे तस्कर चक्क अ‍ॅम्ब्युलन्समधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन आले होते. चारही तस्करांना पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून साडे पाच कोटी रूपये किंमतीची पाच व्हेल माशाची पाच किलो उलटी (अम्बरग्रीस) जप्त केली आहे. सिध्दार्थ विठ्ठल लाकडे, नासिक अहमद रहिमान, किरण गोविंद भाटकर (रा. रत्नागिरी) आणि अनिस इसा शेख (रा. हुपरी, कोल्हापूर), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

एलसीबीची धडाकेबाज कामगिरी: दिल्ली, उत्तर प्रदेशातून चारचाकी कार चोरणार्‍या तसेच दुचाकी चोरणार्‍या आंतरराज्य टोळीला जेरबंद करणार्‍या सातारा एलसीबीने आणखी एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. सातारा-पुणे मार्गावर चौघेजण अ‍ॅम्ब्युलन्समधून व्हेल माशाची उलटी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबर्‍याने दिली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि. 9) सापळा लावला. काही वेळाने एक अ‍ॅम्ब्युलन्स (क्र. एम. एच. 08 ए. पी. 3443) पुण्याकडून सातार्‍याकडे येताना दिसली. पोलिसांनी अ‍ॅम्ब्युलन्सची तपासणी केली असता, अ‍ॅम्ब्युलन्समध्ये एका पिशवीत व्हेल माशाची उलटी (अम्बरग्रीस) आढळून आली.

व्हेल माशाची उलटी प्रतिबंधीत पदार्थ: प्रतिबंधित असलेली व्हेल माशाची उलटी आढळल्याने पोलिसांनी वन अधिकार्‍यांना पाचारण केले. त्यांनी तो पदार्थ व्हेल माश्याची उलटी (अंबरग्रीस) असून प्रतिबंधीत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती किलो 1 कोटी रुपये दराने ती विक्री जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चौघाही तस्करांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यप्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.

मोठ्या किंमतीमुळे व्हेलच्या उलटीची तस्करी वाढली: व्हेल मासा समुद्रात अनेक प्रकारचे अन्न खातो. एखाद्या प्रकारचे अन्न पचत नाही. तेव्हा तो उलटी करतो. त्यालाच अम्बरग्रीस म्हटले जाते. बाजारात उलटीला कोटींचा भाव मिळत असल्याने तिची तस्करी वाढली आहे. या उलटीचा वापर सुगंधी उत्पादने तयार करताना होतो. परफ्युम कंपन्या व्हेलच्या उलटीसाठी मोठी रक्कम मोजतात. या किंमतीमुळे व्हेलच्या उलटीला तरंगते सोने (फ्लोटींग गोल्ड) असेही म्हटले जाते.

एलसीबीच्या पथकाला शाब्बासकी: व्हेल माशाची कोट्यवधीची उलटी जप्त करणार्‍या पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, उत्तम दबडे, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, नीलेश काटकर, अजित कर्णे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, मयुर देशमुख, वनक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण, वनपाल कुशाल पावरा, राजकुमार मोसलगी यांना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक बापू बांगर यांनी शाब्बासकी दिली.

हेही वाचा -

  1. Ambergris Seized in Sindhudurg व्हेल माशाची ५ कोटींची उलटी वाहतूक केल्याप्रकरणी गोव्यातील तिघे ताब्यात
  2. Whale vomit पाऊणे सहा कोटींच्या व्हेल माशाची उलटी जप्त तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
  3. Mumbai Crime News पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त एकास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.