ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाईच्या बगाड मिरवणुकीची परंपरा खंडीत होणार; जमावबंदी लागू - सातारा बगाड मिरवणुकीची परंपरा

ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रांच्या कार्यक्रमांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. या यात्रांच्या कालावधीत २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत वाईच्या प्रांताधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पारंपारिक बगाड मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे.

सातारा
सातारा
author img

By

Published : Mar 24, 2021, 7:34 PM IST

सातारा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील फुलेनगर (शहाबाग) व बावधन येथील ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रांच्या कार्यक्रमांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. या यात्रांच्या कालावधीत २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत वाईच्या प्रांताधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पारंपारिक बगाड मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे.

महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथ-काशीनाथाची तसेच फुलेनगर (शहाबाग) येथील काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा दरवर्षी फाल्गुन महिन्यात तीन दिवस भरते. यात्रेत देवाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक, तमाशा, कुस्त्यांचा फड असे कार्यक्रम होतात. यावेळी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. होळी पोर्णिमेच्या दिवशीच्या रात्री बगाड्याचा कौल लावण्यात येतो. तेथून यात्रेस प्रारंभ होतो.

कानाकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती

फुलेनगरची बगाड मिरवणूक मंगळवारी (३० मार्च) तर बावधन येथील बगाड मिरवणूक रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी आहे. परिसरातील वाडीवस्ती व गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. यावेळी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी व बगाड मिरवणुकीचे दृष्य पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजारोंच्या संख्येने येतात.

जमावबंदी आदेश पारित

सद्य स्थितीत देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने तो रोखण्याकरिता यात्रा कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी प्रस्तावित केले आहे. जिल्हा दंडाधिकारी यांनीही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द केले आहेत. सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी वाई तालुक्यातील शहाबाग, फुलेनगर, बावधन, पांढरेचीवाडी, वाघजाईवाडी, शेलारवाडी, म्हातेकरवाडी, अनपटवाडी, नागेवाडी, दरेवाडी, कणुर व कडेगांव या गावांमधून जमावबंदीचे आदेश पारित केले आहेत.

पाच जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी

यात्रा कालावधीत नित्याचे धार्मिक विधी फक्त संबंधित पुजारी व ठराविक पाच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडता येणार आहेत. बगाड व छबिना काढण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच या कालावधीत सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.