ETV Bharat / state

32 गावांचा पाणी योजनेत समावेश न केल्यास सामूदायिक जलसमाधी, गावकऱ्यांचा इशारा

32 गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला नसल्याने गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील 32 गावांना टेंभू उपसा जल सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

author img

By

Published : Jul 21, 2019, 8:34 AM IST

Updated : Jul 21, 2019, 9:58 AM IST

गावकऱ्यांचा इशारा

सातारा : माण-खटाव तालुक्याच्या 32 गावांच्या शेजारून टेंभू योजनेचा जलसेतू जात असून केवळ पाणी योजनेत या गावांचा समावेश नसल्याचे कारण देत या गावांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील 32 गावांना टेंभू उपसा जल सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर पाणी दिले नाही तर आम्ही सगळे 32 गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालणार असून एक महिन्याची मुदत आम्ही सरकारला देत आहोत, अशी घोषणा गावकऱ्यांनी केली आहे. शनिवारी कुकुडवाड येथे भरवलेल्या एल्गार परिषदेत गावकऱ्यांनी ही घोषणा केली.

टेंभू योजनेत समावेश करण्याची गावकऱ्यांची मागणी

आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 32 गावातील शेतकरी आपली जनावरे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोडतील. दुसऱ्या टप्पात 20 ऑगस्टला आम्ही सगळे लोक चितळी येतील कॅनॉलमध्ये सामूदायिक जलसमाधी घेणार तसेच कॅनॉल देखील फोडणार आहोत, असा निर्णय एल्गार परिषदेत घेण्यात आला आहे.

या पाण्याच्या एल्गार परिषदेला आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम गारळे, भाजपचे अनिल देसाई, सुरेश शिंदे, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर यांसह 32 गावातील लोक उपस्थित होते.

टेंभू योजनेत या गावांचा समावेश करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री यांच्या बरोबर बैठक केली असून त्यांनी या गावांचा समावेश करणार असल्याचे सांगितले आहे, असे यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले.

Intro:सातारा माण-खटाव तालुक्याच्या 32 गावंच्या शेजारून टेंभू योजनेचा जलसेतु जात असून केवळ पाणी योजनेत या गावांचा समावेश नसल्याचे कारण देत या गावांना वंचित ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील 32 गावांना टेंभू उपसा जल सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर पाणी नाही दिले तर, आम्ही सगळे 32 गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालणार असून आज पासून एक महिन्याची मुदत आम्ही सरकारला देत आहोत. अशी घोषणा आज पाणी परिषदेत 32 गावातील नागरिकांनी कुकुडवाड गावात येऊन केली
Body:आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 32 गावातील शेतकरी आपली जनावरे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्यात येणार आहेत व दुसर टप्पा पुढे 20 ऑगस्टला आम्ही सगळे लोक चितळी येतील कॅनॉल मध्ये सामुदायिक जलसमाधी घेणार तसेच कॅनॉल देखील फोडणार आहोत असा निर्णय एल्गार परिषदेत घेण्यात आला आहे.

यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले,टेंभू योजनेत या गावांचा समावेश करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री यांच्या बरोबर बैठक केली असून त्यांनी या गावांचा समावेश करणार असल्याचे सांगितले आहे.

या पाण्याच्या एल्गार परिषदेला आमदार जयकुमार गोरे ,माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम गारळे, भाजपचे अनिल देसाई, सुरेश शिंदे,पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर यांसह 32 गावातील लोक उपस्थित होते.Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 9:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.