ETV Bharat / state

.. म्हणून कोरेगावातील शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षाने तीन एकरातील ऊस पेटवला

20 महिने ऊस शेतात उभा आहे. अद्याप गाळप न झाल्याने उसाच्या वजनात मोठी घट झाली. ऊस तोडीचे योग्य नियोजन नसल्याने शेतकर्‍यांचा ऊस अद्याप शेतात उभा आहे. यापुढे सरकारने दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी देखील राजेंद्र बर्गे यांनी केली आहे. अनेक कारणे सांगून ऊसतोड मजूर शेतकर्‍यांकडून ऊसतोडीसाठी प्रतिगुंठा पैसे घेतात. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पालापाचोळा जास्त असल्याचे सांगून ऊस तोडण्यास नकार दिल्यामुळे बर्गे यांनी मजुरांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी स्टाईलने निषेध केला.

vice president of koregaon farmers association set fire to three acres of sugarcane in karad
कोरेगावातील शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षाने तीन एकरातील ऊस पेटवला
author img

By

Published : Jun 4, 2022, 7:28 PM IST

कराड (सातारा) - वेळेत ऊसतोड न मिळाल्याने आणि मजुरांनी उसाला जास्त पालापाचोळा असल्याने ऊस तोडण्यास नकार दिल्याने कोरेगाव तालुक्यातील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वत:चा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. ऊसतोड मजुरांना शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देत गांधीगिरी स्टाईलने त्यांचा सत्कार केला. सहकार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात ऊसतोडीचे योग्न नियोजन न झाल्यामुळे शेतकर्‍यांवर ऊस पेटविण्याची वेळ आल्याचा आरोप बर्गे यांनी केला आहे.

पेटवून ऊस तोडण्याची वेळ - राज्यातील अनेक भागात अद्यापही साखर कारखाने सुरू आहेत. ऊस तोडीचे योग्य नियोजन न झाल्याचा तोटा यंदा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. सातारा जिल्ह्यातील चिंचणेर (ता. कोरेगाव) येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी तीन एकरातील उभा ऊस पेटवून देत आपला संताप व्यक्त केला. राज्यकर्त्यांमुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर ही वेळ आली असल्याची खंत बर्गे यांनी व्यक्त केली. तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्ह्यातच योग्य वेळेत ऊसतोड न मिळाल्याने शेतकर्‍यांवर आपला ऊस पेटवून तोडावा लागला असल्याचा आरोपही बर्गे यांनी केला.

कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी - 20 महिने ऊस शेतात उभा आहे. अद्याप गाळप न झाल्याने उसाच्या वजनात मोठी घट झाली. ऊस तोडीचे योग्य नियोजन नसल्याने शेतकर्‍यांचा ऊस अद्याप शेतात उभा आहे. यापुढे सरकारने दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी देखील राजेंद्र बर्गे यांनी केली आहे. अनेक कारणे सांगून ऊसतोड मजूर शेतकर्‍यांकडून ऊसतोडीसाठी प्रतिगुंठा पैसे घेतात. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पालापाचोळा जास्त असल्याचे सांगून ऊस तोडण्यास नकार दिल्यामुळे बर्गे यांनी मजुरांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी स्टाईलने निषेध केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.