सातारा Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी वाईतील महागणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गणपती घाटाची स्वच्छता (Ganpati Ghat) केली. घाट स्वच्छ करताना श्रीगणेशाची सेवा करत असल्याची भावना मनात निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उदयनराजेंनी व्यक्त केलीय.
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद : 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा (Ayodhya Ram Mandir Pratisthapana) साजरा होत असताना, देशाच्या विविध भागांत स्वच्छता अभियान राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी मंदिरांच्या परिसरात स्वच्छता केली. खासदार उदयनराजेंनी देखील वाई दौऱ्यावर असताना वाईच्या गणपती घाटावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
मान्यवरांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह माजी आमदार मदन भोसले, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे, वाई तालुका अध्यक्ष दीपक ननावरे, शहराध्यक्ष विजय ढेकणे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल भिलारे, प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, सांस्कृतिक प्रकोष्ठचे पंकज चव्हाण, बाजार समिती संचालक विवेक भोसले, ग्रामोद्योग आघाडीचे सचिन घाटगे, काशिनाथ शेलार आदी मान्यवर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
उदयनराजेंनी रेखाटलं कमळाचं चित्र : वाई येथे भारतीय जनता पक्षाच्या भित्तीलेखन मोहिमेतही उदयनराजेंनी भाग घेतला. यावेळी त्यांनी कमळाचं चित्र रेखाटून 'पुन्हा एकदा मोदी सरकार, असा मजकूर लिहिला. माजी आमदार मदन भोसले, सुरभी भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले होते.
मोदी सरकारनं जारी केली अर्धा दिवस सुट्टी : प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण देशात अर्धा दिवस सुट्टी देण्याचा आदेश मोदी सरकारनं जारी केलाय. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा -