ETV Bharat / state

...म्हणून उदयनराजेंनी पोलिसांच्या गाडीतून केली सोलापूरची रपेट

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सोलापूरचा दौरा केला. शहरातील दौरा आटोपून आल्यावर रेस्टहाऊसवर त्यांना युवकांनी गराडा घातला. युवकांची गर्दी वाढल्याने रस्ता रिकामा करणे कठीण झाल्यावर राजांनी शक्कल लढवली अन् आपली अलिशान गाडी सोडून ते पोलीस गाडीतून शहरात रपेट करण्यासाठी रवाना झाले.

उदयनराजेंनी पोलिसांच्या गाडीतून केली सोलापूरची रपेट
author img

By

Published : Jun 14, 2019, 8:52 PM IST

सोलापूर- आपल्या हटके स्टाईलमुळे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात. राजांची ही स्टाईल आज सोलापूरकरांनाही पाहायला मिळाली. शहरातील दौरा आटोपून आल्यावर रेस्टहाऊसवर त्यांना भला मोठा हार घालण्यात आला. याठिकाणी युवकांनी राजेंना गराडा घातला. युवकांची गर्दी वाढल्याने रस्ता रिकामा करणे कठीण झाल्यावर राजांनी शक्कल लढवली अन् आपली अलिशान गाडी सोडून ते पोलीस गाडीतून शहरात रपेट करण्यासाठी रवाना झाले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

सोलापूरात माध्यमांशी बोलताना उदयनराजे

उदयनराजे सोलापूरात येणार याची खबर आधीच माध्यमांतून युवकात पोहोचली होती. महाराज सोलापूरात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार आणले होते. तसेच एक नेता... एक बार... उदयन महाराज...बार बार अशा घोषणांचा आवाज घुमत होता. प्रत्येकजण महाराजांसोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडत होता.

त्यांच्या चाहत्यांबद्दल त्यांना विचारल्यावर त्यांनी आपल्या नव्या पिढीचे ज्ञान मान्य करत आपण किती साधा फोन वापरतो ते आपल्या खास शैलीत सांगितले. तसेच स्मार्ट फोनमुळे उद्भवणाऱया नेकडाऊन कम्युनिटी आणि इतर समस्यांबाबत प्रबोधनाची अपेक्षा त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.

Intro:सोलापूर :आपल्या हटके स्टाईलमुळं सातारचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी चर्चेत असतात.राजांची ही स्टाईल आज सोलापूरकरांनाही पाहायला मिळाली.कॉलर उडवणं,त्यांचं गाणं,हातवारे,रॉयल राहणं यामुळं ते युवकांच्या गळ्यातील ताईत ठरले आहेत.ते सोलापुरात आल्यावर त्यांना असा गराडा पडला. शहरातला दौरा आटोपून आल्यावर रेस्टहाऊसवर त्यांना हा भला मोठा हार घालण्यात आला.गर्दी वाढत होती,रस्ता काढणं कठीण झाल्यावर राजांनी शक्कल लढवली अन आपल्या लक्झरीअस गाडया सोडून ते पोलीस गाडीतून असे अनपेक्षित शहरात रपेटसाठी रवाना झाले.त्यामुळं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला..

Body:ते आले...त्यांनी पाहिलं अन जिंकुन घेतलं सारं ...असंच वर्णन खासदार उदयनराजे भोसले यांच्या सोलापूर दौऱ्याच करावं लागेल. कारण राजे सोलापूरात येणार याची खबर आधीच समाज माध्यमांनी युवकांत पोहचवली होती.मग काय पुष्पगुच्छ,पुष्पहार,पाकळ्यांचा वर्षाव अन घोषणांचा आवाज सारं कसं भारल्यासारखं घडत होतं.एक नेता..एक बार..उदयन महाराज... बार बार अशा घोषणांचा आवाज घुमत होता.प्रत्येकजण महाराजांसोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडत होता...गर्दीचा हा गराडा कांही केल्या संपत नव्हता...कारण जितके जात होते,तितके नव्यानं गर्दी करत होते.

Conclusion:युवक फॅनफालोअर्सबाबत त्यांना विचारल्यावर मात्र त्यांनी आपल्या नव्या पिढीचं ज्ञान मान्य करत आपण किती साधा फोन वापरतो ते आपल्या खास शैलीत सांगत नेकडाऊन कम्युनिटीबद्दल प्रबोधनाची अपेक्षा माध्यमांकडे व्यक्त केली...

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.