ETV Bharat / state

पुतण्या लघुशंकेची भाषा करतो.. आमच्या चुका झाल्या, पण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही; उदयनराजेंचे पवारांना प्रत्युत्तर - udayanraje bhosale latest news

लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केलं, तुमचा पुतण्या लघुशंकेची भाषा करतो आणि तुम्ही त्यावर पांघरूण घालता, या सगळ्यात आमची चूक होती का, असे सवाल  उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना जाहीर सभेत केले आहेत. ढगाला लागली कळं, राष्ट्रवादीची मतं गळं आणि धनुष्यबाण अन् कमळ फुलं, अशा काव्यमय शब्दांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या सातार्‍यातील सभेची खिल्ली उडवली.

उदयनराजे भोसले
author img

By

Published : Oct 20, 2019, 12:00 AM IST

सातारा - लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केलं, तुमचा पुतण्या लघुशंकेची भाषा करतो आणि तुम्ही त्यावर पांघरूण घालता, राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा होतो आणि तुम्ही भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करता या सगळ्यात आमची चूक होती का, असे सवाल उदयनराजे भोसले यांनी नी शरद पवारांना जाहीर सभेत केले आहेत. आमच्याकडून चुका घडल्या असतील परंतु, आम्ही कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, असा घणाघात उदयनराजेंनी केला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराची सांगता कराड तालुक्यातील मसूर येथे झाली. त्यावेळी उदयनराजे बोलत होते.

उदयनराजे भोसले

कराड उत्तरचा भावी आमदार हा धैर्यशील कदमच असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उदयनराजे म्हणाले, 370 कलमाला विरोध करून तुम्ही शहिदांच्या जखमांवर मीठ चोळले. सातारचे पाणी बारामतीला वळविले. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पाडले. अनेक वर्षे मराठा आरक्षणाची फरपट केली. तुमच्या माणसांनी भ्रष्टाचार करून राज्य सहकारी बँक रसातळाला नेली. यामध्ये आमची चूक होती की जनतेची चुक होती याचा जबाब शरद पवार यांनी सर्वांसमोर द्यावा. आम्ही खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो, असेही उदयनराजे म्हणाले. पवारसाहेब तुम्ही उभे राहणार असाल तर मी निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका मी घेतली होती. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा मी नेहमीच आदर केला आणि यापुढेही करेन. कौरवांची साथ सोडून पांडवांमध्ये सहभागी झालो. लबाडांची साथसंगत सोडली, यात आमची काय चूक होती ते तुम्ही सांगा, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

हेही वाचा - पाऊस.. प्रचार अन् पवार...

ढगाला लागली कळं, राष्ट्रवादीची मतं गळं आणि धनुष्यबाण अन् कमळ फुलं, अशा काव्यमय शब्दांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या सातार्‍यातील सभेची खिल्ली उडवली. राज्याचं दिवाळं निघालं तरी त्यांच्याच हाती राज्य सोपवा, असे पवारसाहेब म्हणत असतील, तर माझी चूकच आहे. चुकांचे खापर आमच्या माथी फोडू नका. जनताजनार्दन या सगळ्या चुकांची दुरुस्ती महायुतीच्या बाजूने कौल देऊन करेल, असे उदयनराजे म्हणाले.

Intro:लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केलं, राष्ट्रवादीचे फक्त 4 खासदार निवडून आले, बाकीचे पडले, तुमचा पुतण्या लघुशंकेची भाषा करतो आणि तुम्ही त्यावर पांघरूण घालता, राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा होतो आणि तुम्ही भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करता, या सगळ्यात आमची चूक होती का, असे सवाल पे सवाल उदयनराजेंनी जाहीर सभेत शरद पवारांना उद्देशून केले. आमच्याकडून चुका घडल्या असतील. परंतु, आम्ही कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, असेही उदयनराजे म्हणाले. Body:
कराड (सातारा) - लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केलं, राष्ट्रवादीचे फक्त 4 खासदार निवडून आले, बाकीचे पडले, तुमचा पुतण्या लघुशंकेची भाषा करतो आणि तुम्ही त्यावर पांघरूण घालता, राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा होतो आणि तुम्ही भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करता, या सगळ्यात आमची चूक होती का, असे सवाल पे सवाल उदयनराजेंनी जाहीर सभेत शरद पवारांना उद्देशून केले. आमच्याकडून चुका घडल्या असतील. परंतु, आम्ही कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, असेही उदयनराजे म्हणाले. 
    कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराची सांगता कराड तालुक्यातील मसूर येथे झाली. त्यावेळी उदयनराजे बोलत होते. 
कराड उत्तरचा भावी आमदार हा धैर्यशील कदमच असेल, असे सांगून उदयनराजे म्हणाले, 370 कलमाला विरोध करून तुम्ही शहिदांच्या जखमांवर मीठ चोळले. सातारचे पाणी बारामतीला वळविले. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पाडले. अनेक वर्षे मराठा आरक्षणाची फरपट केली. तुमच्या माणसांनी भ्रष्टाचार करून राज्य सहकारी बँक रसातळाला नेली. यामध्ये आमची काय चूक होती की जनतेचं कुठं चुकलं? याचा जबाब शरद पवार यांनी सर्वांसमोर द्यावा. आम्ही खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो, असेही उदयनराजे म्हणाले. पवारसाहेब तुम्ही उभे राहणार असाल तर मी निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका मी घेतली होती. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा मी नेहमीच आदर केला आणि यापुढेही करेन. कौरवांची साथ सोडून पांडवांमध्ये सहभागी झालो. लबाडांची साथसंगत सोडली, यात आमची काय चूक होती ते तुम्ही सांगा, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. 
    सातार्‍यात काल झालेला पाऊस हा शुभशकुन नव्हे, तर घाण धूऊन टाकल्याचे संकेत आहेत. त्याची सुरूवात जिल्ह्याच्या राजधानीत झाली. सातार्‍यातील सभा म्हणजे काळूबाळूचा तमाशा होता. ढगाला लागली कळं, राष्ट्रवादीची मतं गळं आणि धनुष्यबाण अन् कमळ फुलं, अशा काव्यमय शब्दांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या सातार्‍यातील सभेची खिल्ली उडविली. राज्याचं दिवाळं निघालं तरी त्यांच्याच हाती राज्य सोपवा, असे पवारसाहेब म्हणत असतील, तर माझी चूकच आहे. त्यांच्या चुकांचे खापर आमच्या माथी फोडू नका. जनताजनार्दन या सगळ्या चुकांची दुरुस्ती महायुतीच्या बाजूने कौल देऊन करेल, असे उदयनराजे म्हणाले. 
    कराड उत्तरचे 20 वर्षे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांनी आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठीच अपक्ष पिल्लू उभं केलं असल्याचा आरोप कराड उत्तरमधील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी केले. विद्यमान आमदारांनी योजलेला मतविभागणीचा डाव जनता ओळखून आहे. परंतु, यावेळी जनता फसणार नाही. केंद्राप्रमाणे राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे. या परिवर्तनाच्या लाटेत कराड उत्तरच्या जनतेने सिंहाचा वाटा उचलावा, असे आवाहन कदम यांनी केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.