ETV Bharat / state

उदयनराजे भोसले, रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; मराठा आणि धनगर आरक्षणाची केली मागणी - मराठा आरक्षण

Maratha Dhangar Reservation : खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून द्यावे, अशी मागणी दोघांनी पंतप्रधान मोदींकडे केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 10:31 PM IST

Updated : Dec 19, 2023, 10:38 PM IST

नवी दिल्ली/सातारा Maratha Dhangar Reservation - आरक्षणाच्या प्रश्नावर नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून देण्याची मागणी दोघांनी केली आहे.

आरक्षणावर भोसले-निंबाळकरांची मोदींशी चर्चा : मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भाने खासदार उदयनराजे आणि खासदार निंबाळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार मोदींनी दोघांना भेटीची वेळ दिली. खासदार उदयनराजे आणि खासदार निंबाळकरांनी मोदींसमोर मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या दोन्ही प्रश्नांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

उदयनराजेंनी मांडली मराठा समाजाची कैफियत : पंतप्रधान मोदींसमोर भोसले-निंबाळकर या दोन्ही खासदारांनी मराठा समाजाची कैफियत मांडली. मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. मराठा समाज हा सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. परंतु, या समाजाची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. शिक्षणाची फी भरणे देखील मुलामुलींना अवघड झाले आहे. शिक्षणानंतर नोकरीचीही श्वाश्वती नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.

अनुसूचित जातीमधून आरक्षण देण्याची मागणी : धनगर समाज अनेक वर्षे अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळावे,यासाठी झटत आहे. इतर राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्रात 'धनगड' शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही. आपण यामध्ये लक्ष घालून धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे आणि निंबाळकरांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

दिल्लीत छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी नवी दिल्लीत ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असता केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. साताऱ्यातील लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रणही उदयनराजेंनी मोदींना दिले.

हेही वाचा -

  1. "फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देणार", मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
  2. डेडलाईन 24 डिसेंबरच, पुढचं आंदोलन सरकारला परवडणारं नसेल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  3. कुणबी मराठ्यांच्या आतापर्यंत 72 लाख नोंदी सापडल्या आहेत - मनोज जरांगे पाटील

Last Updated : Dec 19, 2023, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.