ETV Bharat / state

शिवसागर जलाशयात महाबळेश्वरमधील दोन युवक बुडाले - शिवसागर जलाशयात दोन युवक बुडाले

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचे दोन युवक बुडाले आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत.

Shivsagar lake
शिवसागर जलाशयात दोन युवक बुडाले
author img

By

Published : Jan 26, 2021, 4:38 AM IST

सातारा - कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचे दोन युवक बुडाले आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. अनिकेत भीमराव कदम (वय १८) आणि सुशांत लक्ष्मण कदम (वय १८) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.

बाबू शिंदे - ग्रामस्थ, रुळे

यात्रेसाठी आलेला गावी

सोमवारी रुळे गावच्या ग्रामदैवताची यात्रा होती. यात्रा साजरी होणार नसली तरी देवदर्शन होणार होते. सुशांत हा मुंबई वरून यात्रेसाठी गावी आला होता. आपल्या गावातील मित्र अनिकेत हा जनावरे चारायला घेऊन निघाला असता, आपणही तिकडे जावे म्हणून सुशांत देखील अनिकेत सोबत गेला. जनावरे कोयना धरण शिवसागर जलाशयाकाठी चरत असतानाच दोघांनाही पोहण्याचा मोह झाला.

पोहता येऊनही झाला घात

अनिकेत हा कायम गावातच राहत असल्याने त्याला पोहायला येत होते. दोघेही कपडे काढून सायंकाळच्या सुमारास पोहायला कोयना नदीत उतरले. मात्र सुशांतला पोहायला येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी अनिकेत त्याला वाचवण्यासाठी सरसावला असता, सुशांतने त्याला मिठी मारली असावी, त्यातच दोघेही बुडाले. खूप वेळ होउनही मुले घरी का आली नाहीत म्हणून घरातील व गावातील लोकांनी शोधाशोध सुरू केली.

गावावर शोककळा

नदीकाठी कपडे दिसल्याने दोघेही बुडल्याचा संशय आला. गावातील दोन मुले बुडल्याने रुळे ग्रामदैवतेचे यात्रेचे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून अद्यापही दुस-याचा शोध सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास मेढा पोलिस ठाणे अंतर्गत तापोळा पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार गायकवाड व माने तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.