ETV Bharat / state

भारतीय प्रजातीच्या कासवाची तस्करी करणारे दोघे ताब्यात

author img

By

Published : Mar 14, 2020, 7:42 AM IST

साताऱ्यात 'इंडियन सॉफ्ट शेल' जातीच्या कासवाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंजुष शिवाजी जगताप (वय १९, रा. रामनगर, मुळ रा.शहापूर, उस्मानाबाद) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे. यातील एकजण अल्पवयीन आहे.

Tortoise Smuggling
कासवाची तस्करी करणारे दोघे ताब्यात

सातारा - कासवाची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्या दोघांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. या तस्करीमागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. मंजुष शिवाजी जगताप (वय १९, रा. रामनगर, मुळ रा.शहापूर, उस्मानाबाद) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे. यातील एकजण अल्पवयीन आहे.

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दोन युवक शाहूपुरी चौकामध्ये पिशवीत काहीतरी घेवून संशयीरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने शाहूपुरी चौकात सापळा लावून दोन तरुणांना पकडले. त्यांची चौकशी केली असता पिशवीत जिवंत कासव आढळले. आरोपी जगतापबरोबर एका अल्पवयीन मुलाचा या गुन्ह्यात सहभाग आहे. त्यांनी हे कासव विक्रीसाठी आणले होते. 'इंडियन सॉफ्ट शेल' जातीचे हे कासव आहे. त्याची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात मोठी किंमत असल्याचे, पोलिस‍ांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईत कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार

टोळी असण्याची शक्यता -

साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड यांनी या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. कासवाच्या तस्करीमागे मोठी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस आणि वनविभाग अधिक तपास करत आहे. पैशाच्या हव्यासापोटी लहान मुले अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. त्यांना अशा गुन्ह्यांमध्ये गुंतवून सराईत गुन्हेगार आपला कार्यभाग साधतात. पालकांनी आपल्या पाल्याबाबत जागृत रहावे, असे आवाहन शीतल राठोड यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.