ETV Bharat / state

'त्या' दोघांची इराणच्या तुरूंगातून ९ महिन्यांनी सुटका; खासदार श्रीनिवास पाटलांच्या प्रयत्नांना यश - सातारा मर्चंट नेव्ही युूवक बातमी

एक वर्षापूर्वी मर्चंट नेव्हीतील दोन भारतीय तरूणांना इराणच्या समुद्र हद्दीमध्ये गेल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून व्यक्तींना अटक केली होती. त्यांच्या सुटकेसाठी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश आले असून यांच्याप्रयत्नांमुळेच दोन्ही मुले सुखरूप परत आली आहेत.

two-indian-released-from-iranian-prison-efforts-taken-by-mp-shrinivas-patil
'त्या' दोघांची इराणच्या तुरूंगातून ९ महिन्यांनी सुटका; खासदार श्रीनिवास पाटलांच्या प्रयत्नांना यश
author img

By

Published : Oct 4, 2020, 10:42 PM IST

कराड (सातारा)- इराणमध्ये कैदी बनवून डांबून ठेवलेल्या मर्चंट नेव्हीतील दोन भारतीय तरूणांची तब्बल ९ महिन्यांनी सुटका झाली असून नुकतेच ते मायदेशी परतले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश आले. वीरेंद्र आनंदराव पाटील रा. शिरवडे, ता. कराड आणि भरत रवींद्र पाटील रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली, अशी त्यांची नावे आहेत.

सुटकेसंदर्भात प्रतिक्रिया

एक वर्षापूर्वी मुंबईच्या एका एजन्सीमार्फत लिब्रा नावाच्या जहाजातून ते इराणला गेले होते. इराणच्या समुद्र हद्दीमध्ये गेल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून इराण सैन्याने जहाज आणि जहाजावरील दहा ते बारा व्यक्तींना अटक केली होती. त्यामध्ये या दोघांचा समावेश होता. अटक केल्यानंतर त्यांना बुशर बंदर येथील तुरुंगात ठेवले होते. त्यांचा मोबाईल आणि पासपोर्ट काढून घेतला होता. यामुळे दोघांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नव्हता. सातासमुद्रापार अडकलेले हे दोन्ही तरूण घाबरले होते. दरम्यान, तुरूंगातील त्यांच्या एका इराणच्या मित्राला भेटण्यासाठी त्याची बहिण आली होती. तिला थोडेफार उर्दू समजत असल्याने या दोन तरुणांशी तिने मोडक्या-तोडक्या भाषेत सवांद साधला. या दोन्ही तरूणांवर बेतलेल्या प्रसंगाची तिलाही कल्पना आली. त्यामुळे तिने त्यांच्याकडून कुटुंबियांचा मोबाईल नंबर घेतला. आपल्या मोबाईलवरून व्हॉटसअपद्वारे या दोन्ही तरूणांच्या कुटुंबीयांना मेसेज पाठवला. त्यामुळे तीन महिन्यानंतर दोन्ही तरूणांच्या कुटुंबीयांना वस्तुस्थिती समजली. स्पष्ट आणि सखोल माहिती नसल्यामुळे परदेशात अडकलेल्या आपल्या मुलांना कसे सोडवायचे, हा प्रश्न दोन्ही तरूणांच्या कुटुंबियांसमोर होता. तसेच मुलांची चिंताही त्यांना सतावत होती.

इराणमधील तुरूंगात असलेल्या शिरवडे (ता. कराड) येथील वीरेंद्र याचे वडील आनंदराव पाटील यांनी तात्काळ खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांची भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ खासदार श्रीनिवास पाटील यांना कळविले. पाटील यांनी भारताचे पूर्वीचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांना सांगून सामाजिक कार्यकर्ते संजय पराशर यांच्या मदतीने पाठपुरावा सुरू केला आणि दोन्ही तरूणांची सुटका करण्यात यश आले. कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर वीरेंद्र पाटील आणि भरत पाटील यांची इराणमधील तुरूंगातून सुटका झाली. हे दोघेही नुकतेच मायदेशी परतडले आहेत. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने खासदार श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांची कराडच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. पाटील यांनी आपला प्रशासकीय अनुभव पणाला लावून दोन्ही तरूणांना मायदेशी परत आणल्याने वीरेंद्रचे वडील आनंदराव पाटील यांनी पाटील यांच्यामुळेच दोन्ही मुले सुखरूप परत आल्याची भावना व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.