ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील 2 गुन्हेगारी टोळ्या विविध तालुक्यातून हद्दपार - घरफोडी

वाई परिसरातील घरफोडी, चोरी करणाऱ्या टोळीतील 5 व वडूज येथील बेकायदा पिस्तूल दाखवत खंडणी उकळणाऱ्या टोळीतील 2 असे 7 जणांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले.

पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा
author img

By

Published : Dec 17, 2019, 3:46 AM IST

Updated : Dec 17, 2019, 6:46 AM IST

सातारा - वाई परिसरातील घरफोडी, चोरी करणाऱ्या टोळीतील 5 व वडूज येथील बेकायदा पिस्तूल दाखवत खंडणी उकळणाऱ्या टोळीतील 2 असे 7 जणांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

वाईच्या टोळीचा प्रमुख आकाश शिवाजी वागले जाधव (वय 28 वर्षे, रा. गुलमोहर कॉलनी, वाई), किरण रामसिंग घाडगे (वय 21 वर्षे), भुपाल किसन घाडगे (वय 40 वर्षे), कैलास भानुदास काळे (वय 28 वर्षे, तिघेही रा. सैदापूर ता सातारा), राहुल अमर घाडगे (वय 18 वर्षे, रा. लाखानगर, वाई) या टोळीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाई, महाबळेश्वर, जावळी आणि खंडाळा या 4 तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

हेही वाचा - कराडमध्ये 'विजय दिवस' समारोहाला सुरुवात, सोमवारी थरारक प्रात्यक्षिके

वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा 5 बंदुका व 10 जिवंत काडतूसे जवळ बाळगणे, खंडणी मागणे, हाणामारी, अपहरण करणे, असे गुन्हे दाखल असलेले टोळी प्रमुख सौरभ सुनील जाधव (वय 22 वर्षे) व सौरभ विजय कुलकर्णी (वय 21 वर्षे, दोघेही रा. गुरसाळे ता. खटाव) यांना सातारा, कोरेगाव, माण, खटाव, खंडाळा व फलटण या 6 तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

या दोन्ही टोळ्यांनी वाई व वडूज परिसरात गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पण, या टोळीतील सदस्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - ओएलएक्सवर कार विक्रीची जाहिरात देऊन ७६ हजाराची फसवणूक

Intro:सातारा : वाई परिसरातील घरफोडी, चोरी करणाऱ्या टोळीतील 5 व वडूज येथील बेकायदा पिस्टल बाळगणे व खंडणी उकळणाऱ्या टोळीतील 2 असे 7 जणांना पोलिस अधिक्षकांनी तडीपार केले.
Body:या बाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली. वाईच्या टोळीचा प्रमुख आकाश शिवाजी वागले जाधव (वय 28 रा गुलमोहर कॉलनी वाई), किरण रामसिंग घाडगे (वय 21), भुपाल किसन घाडगे (वय 40), कैलास भानुदास काळे (वय 28 तिघेही रा. सैदापूर ता सातारा), राहुल अमर घाडगे (वय 18 रा लाखानगर वाई) या टोळीला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाई, महाबळेश्वर, जावली, खंडाळा या 4 तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा पाच बंदुका व दहा जिवंत काडतूसे जवळ बाळगणे, खंडणी, मारामारी, अपहरण करणे असे गुन्हे दाखल असलेले टोळी प्रमुख सौरभ सुनील जाधव (वय 22) व सौरभ विजय कुलकर्णी (वय 21 दोघेही रा. गुरसाळे ता. खटाव) यांना सातारा, कोरेगाव, माण, खटाव, खंडाळा व फलटण या 6 तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

या दोन्ही टोळ्यांनी वाई व वडूज परिसरात गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तथापि या टोळीतील सदस्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले

vdo
माहिती देताना सर्जेराव पाटील

---------------

Conclusion:
Last Updated : Dec 17, 2019, 6:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.